शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:51 IST

‘मी डोक्यावर कफन बांधले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत शड्डू ठोकला. ‘राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत?’

छत्रपती संभाजीनगर : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी भाजपचे खा. नारायण राणेंविरोधात दंड थोपटले. राणे यांनी सोमवारी ‘पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन’ अशी धमकी महाजन यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी ‘मी डोक्यावर कफन बांधले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत शड्डू ठोकला. ‘राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत?’ असे आव्हानही त्यांनी दिले.

प्रकाश महाजन आणि राज्यातील भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून हमरीतुमरी सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे. नितेश राणे हे व्यर्थ बडबड करतात, असा आरोप महाजन यांनी केला होता. या आरोपानंतर खा. राणे यांनी महाजन यांना आमच्या नादाला लागू नको, उलट्या करायला लावीन, अशी धमकी दिली होती. राणे यांच्या धमकीनंतर महाजन यांना दोन दिवसांपासून फोनवरून जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. धमक्यांचे कॉल महाजन यांनी रेकॉर्ड करून ठेवले आहेत.

थेट आव्हानदरम्यान, राणे यांना उत्तर देण्यासाठी महाजन मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासमवेत डोक्याला कफन बांधून क्रांती चौकात आले. तेथे पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ‘मला धमक्या काय देता? तुम्हाला मला मारायचे असेल तर तुमच्या पुण्यातील घरी येऊ की, कणकवलीत येऊ? तुम्ही मंत्री असताना दिलेली जमीन न्यायालयाने रद्द केली. या जागेच्या बदल्यात तुम्हाला पुण्यात बंगला मिळालाय ना, असे आव्हान दिले.

खपवून घेणार नाहीराणेंच्या प्रचारासाठी राजसाहेब गेले होते. मी पण होतो; पण त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना त्यांनी कसे बोलायचे हे शिकवले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संदर्भ देऊन तो काहीही बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असे महाजन म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेBJPभाजपाMNSमनसे