दूध वाहतूक करणारे वाहन धडकले किराणा दुकानाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:36 IST2018-01-06T00:36:36+5:302018-01-06T00:36:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : दूध वाहतूक करणाºया एका पिकअप वाहनाच्या चालकाला डुलकी लागली आणि सुसाट वाहन रस्त्याशेजारील किराणा ...

दूध वाहतूक करणारे वाहन धडकले किराणा दुकानाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दूध वाहतूक करणाºया एका पिकअप वाहनाच्या चालकाला डुलकी लागली आणि सुसाट वाहन रस्त्याशेजारील किराणा दुकानाची भिंत पाडून दुकानात घुसले. पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनी प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पोलिसांनी सांगितले की, कन्नड येथील एका दूध डेअरीचे दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन (क्रमांक एमएच-२० ईजी १४४६) शुक्रवारी पहाटे चेतक घोड्याकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात होते. हे वाहन पुढे येताच चालकाला डुलकी लागली आणि सुसाट वाहन रस्त्याशेजारील एका किराणा दुकानाला धडकले. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुकानाची भिंत फोडून वाहन आतमध्ये घुसले. या भीषण अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर चालक तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच दुकानदार शरद पाटणी यांनी धाव घेतली. हा टेम्पो सुरेश पवार यांच्या मालकीचा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.