शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:04 AM

औरंगाबाद : ‘ब्रेक द चेन’साठी लावण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उद्यापासून (शनिवार) सकाळी ७ ते ...

औरंगाबाद : ‘ब्रेक द चेन’साठी लावण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उद्यापासून (शनिवार) सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच चालू राहणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर आदेश शनिवारी सकाळी काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.

फळांची विक्री आणि मेडिकल दुकाने यांना दुपारनंतर तीन तासांचा वेळ दिला जाणार आहे, तर इतर अत्यावश्यक सेवांनाही उद्याच्या आदेशात निश्चित वेळ ठरवून दिली जाणार आहे.

१४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचाही फज्जा उडत असून, विनाकारण लोक बाहेर पडताना दिसत आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी आणखी कडक निर्बंध लागू करण्याची आवश्यकता शुक्रवारी सिंचन भवन येथे झालेल्या लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघ व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. आपल्या भावना समजून घेऊन जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक व पोलीस आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दुपारी दिले. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकण्याची जबाबदारी आ. अंबादास दानवे यांच्यावर टाकण्यात आली. त्यानुसार आ. दानवे हे दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटले. या भेटीमध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या.

रस्त्यावर अनावश्यक गर्दी

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत किराणा दुकान, दूध, भाजीपाला, पेट्रोल पंप आदी सुविधा सुरू आहेत. वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. यासंदर्भात विचार करण्यासाठी आयोजित बैठकीत खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे तनसुख झांबड, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, केमिस्ट असोसिएशनचे महासचिव विनोद लोहाडे, निखिल सारडा, तसेच महापालिका उपायुक्त अर्पणा थेटे व पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांची उपस्थिती होती.

चौकट...

लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असलेली दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत.

सध्या रमजान महिना सुरू असल्याने सायंकाळी ठरावीक वेळेत विक्रेत्यांना फळे विक्रीसाठी मुभा द्यावी.

ज्याठिकाणी हॉस्पिटल आहेत तेथील मेडिकल २४ तास सुरू राहू द्यावीत.

मात्र, इतर ठिकाणी असलेली मेडिकलची दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात प्रशासनाने वेळेचे नियोजन करावे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.

चौकट...

आज सुधारित आदेश

लोकप्रतिनिधींच्या एका बैठकीत आज काही सूचना करण्यात आल्या. नंतर काही लोकप्रतिनिधी मला येऊन भेटले. सुधारित आदेश काढण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, कडक निर्बंधांसंबंधीचा आदेश शनिवारी सकाळी काढण्यात येणार आहे.

-सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी