९६ लाखांच्या ड्युलडेस्कची खरेदी

By Admin | Updated: December 18, 2015 23:31 IST2015-12-18T23:28:07+5:302015-12-18T23:31:54+5:30

परभणी : मानव विकास मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ९६ लाख रुपये खर्च करुन १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले

Shopping for 9 6 lakh dualdesk | ९६ लाखांच्या ड्युलडेस्कची खरेदी

९६ लाखांच्या ड्युलडेस्कची खरेदी

परभणी : मानव विकास मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ९६ लाख रुपये खर्च करुन १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले आहेत. आणखी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने शेषमधून ड्युलडेस्क खरेदीसाठीच शिक्षण विभागाला उपलब्ध करुन दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे मिळावेत, यासाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. जिल्ह्यातील नऊही तालुक्यात मानव विकास मिशनच्या योजना राबविल्या जाते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ड्युलडेस्क खरेदी करण्यासाठी ९६ लाख ८ हजार ८१४ रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली होती. या तरतूदीनुसार चालू आर्थिक वर्षात निधी उपलब्ध झाल्यानंतर १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले. त्यामध्ये परभणी तालुक्यात २७६ ड्युलडेस्कसाठी १३ लाख ७६ हजार ९६४ रुपये, सेलू तालुक्यातील २७५ ड्युलडेस्कसाठी १२ लाख ४७ हजार २५० रुपये, मानवत तालुक्यातील १७० ड्युलडेस्कसाठी ८ लाख ४८ हजार १३० रुपये, पाथरी तालुक्यातील १९० ड्युलडेस्कसाठी ८ लाख ९८ हजार २० रुपये, सोनपेठ तालुक्यातील १५५ ड्युलडेस्कसाठी ७ लाख ७३ हजार २९५ रुपये, गंगाखेड तालुक्यातील २२० ड्युलडेस्कसाठी १० लाख ९७ हजार ५८० रुपये, पालम तालुक्यातील २१० ड्युलडेस्कसाठी १० लाख ४७ हजार ६९० रुपये, पूर्णा तालुक्यातील २७० ड्युलडेस्कसाठी १३ लाख ४७ हजार ३० रुपये व जिंतूर तालुक्यातील १९५ ड्युलडेस्कसाठी ९ लाख ७२ हजार ८५५ रुपये खर्च करण्यात आले. ई- निविदेनुसार खरेदी करण्यात आलेले ड्युलडेस्क सर्व तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळांना वितरित करण्यात आले असल्याची माहिती जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Shopping for 9 6 lakh dualdesk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.