दुकानाचा शुभारंभ पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:03 IST2021-04-04T04:03:27+5:302021-04-04T04:03:27+5:30
वैजापूर : शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानकासमोर एका कापड दुकानाचा शुभारंभ टिकटॉक स्टार यांच्या हस्ते झाला. यावेळी बघ्यांची गर्दी ...

दुकानाचा शुभारंभ पडला महागात
वैजापूर : शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानकासमोर एका कापड दुकानाचा शुभारंभ टिकटॉक स्टार यांच्या हस्ते झाला. यावेळी बघ्यांची गर्दी वाढल्याने येथे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्यामुळे हा शुभारंभाचा कार्यक्रम दुकान मालकाला चांगलाच महागात पडला आहे. जमावबंदीचे आदेश झुगारून दुकानदाराने केलेल्या कार्यक्रमामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. दुकान मालकाला २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
या कारवाईने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. शंकर गोरख मापारी असे दंड ठोठावण्यात आलेल्या दुकानमालकाचे नाव आहे. एक एप्रिल रोजी हा प्रकार घडला असून, या ठिकाणी मास्क न वापरता नागरिकांनी गर्दी केली होती. महामार्गालगत हा कार्यक्रम झाल्याने वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती. या कार्यक्रमाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.