दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास
By Admin | Updated: August 7, 2014 01:15 IST2014-08-07T01:15:23+5:302014-08-07T01:15:23+5:30
शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास
शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
जालना येथील रहिवासी सराफा व्यापारी राजेश बाबूराव लोळगे यांची शेलगावात लोळगे ज्वेलर्स ही सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लोळगे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याचांदीचे दागिने असा वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला.
लोळगे हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त झालेले पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. त्यावर पोलिस निरीक्षक पंकज जाधव, फौजदार राजपूत, कॉ. शिवनकर आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच जालना येथून श्वानपथकासही पाचरण करण्यात आले. श्वानाने जालना मार्गावर गावाच्या मुख्यरस्त्याच्या कमानीपर्यंत माग काठून तेथेच घुटमळले. चारीच्या या घटनेमुळे शेलगाव ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.(वार्ताहर)जिल्ह्यात बुधवारी रात्री शेलगावच्या सराफा दुकानासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. जालना शहरातील गांधीनगरातील संतोष घुले यांच्या घरी झालेल्या चोरीत ११ हजाराचे संसार उपयोगी साहित्य चोरून नेले. कुंभारपिंपळगाव ता घनसावंगी येथील बीएसएलच्या टावरवरील ५४ हजार रूपये किमतीच्या ६ बॅटऱ्या चोरून नेल्या, तर धावडा ता. भोकरदन येथील राजू देशमुख यांच्या टेम्पोचे २२ हजार रूपये किमतीचे टायर चोरट्यांनी चोरून नेले.
४मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काही दिवसापूर्वीच जालना- औरंगाबाद ग्रामीण बँक फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. बँकेच्या तीन कुलूपे तोडल्यानंतर सायरनचा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच गावातील बैल, विहिरीवरील मोटारींच्या चोरीच्या घटनाही झालेल्या आहेत. गावात पोलिस चौकी स्थापन करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.