महिला वाहकाच्या श्रीमुखात भडकावली
By Admin | Updated: December 17, 2015 00:14 IST2015-12-17T00:02:16+5:302015-12-17T00:14:45+5:30
औैरंगाबाद : बसस्थानक पोलीस चौकीच्या जमादारानेच महिला वाहक ाच्या श्रीमुखात भडकावल्याने खळबळ उडाली.

महिला वाहकाच्या श्रीमुखात भडकावली
औैरंगाबाद : सुटे पैसे परत करण्यावरून प्रवासी महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि महिला वाहक यांच्यातील किरकोळ वादावर तोडगा काढण्याऐवजी बसस्थानक पोलीस चौकीच्या जमादारानेच महिला वाहक ाच्या श्रीमुखात भडकावल्याने खळबळ उडाली. वाहकाला मारहाण करणारा पोलीस कॉन्स्टेबल दारूच्या नशेत असल्याचा आरोप करून एस. टी. कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने बसस्थानकावर तणाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमादाराला निलंबित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
याविषयी पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर म्हणाले, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा कोळी या साप्ताहिक सुटीनिमित्त गावी गेल्या होत्या. त्या बुधवारी दुपारी धुळे- औरंगाबाद बसने औरंगाबादला येत होत्या. बसच्या वाहक जयश्री सदावर्ते यांना त्यांनी दोनशे रुपये देऊन १६५ रुपयांचे तिकीट घेतले. यावेळी सदावर्ते यांनी ३५ रुपये सुटे नसल्याचे सांगून तिकिटावर तसे लिहून दिले. दरम्यान, कन्नड येथे कोळी यांनी सदावर्ते यांच्याकडे उर्वरित ३५ रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी सुटे नसल्याचे सांगितले. त्यानंतर खुलताबाद येथे