शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

By राम शिनगारे | Updated: May 8, 2023 13:48 IST

छत्रपती संभाजीनगरमधील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये झाली दुर्घटना

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे अशी मृतांची नावे आहेत. चेंबरमध्ये उतरलेल्या आणखी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. खाजगी काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, चारही मजुरांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे यांना मृत घोषित केले. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.  घटनेची माहिती मिळताच मजुरांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. काही नातेवाईक सिटी चौक पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आहे. 

चौघे उतरले होते चेंबरमध्येअंकुश बाबासाहेब थोरात, रावसाहेब सदाशिव घोरपडे, विष्णू उगले आणि बाळू विश्राम खरात (सर्व रा. हिमायतबाग) हे मजूर कामानिमित्त ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते. काही वेळ काम केल्यानंतर अचानक श्वास घेण्यास मजुरांना त्रास होऊ लागला. यातच अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे या दोघांचा मृत्यू झाला. तर विष्णू उगले आणि बाळू खरात याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी