शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! पाच जणांनी मिळून पार्टीसाठी केली दोन हरणांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:52 IST

सोशल मीडियात फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली 

ठळक मुद्देपोलिसांच्या धाडी दरम्यान तिघेजण फरार झाले   वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : दोन हरणांची शिकार करून पार्टीच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याचा वीरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात हरणांचे मांस जप्त करून गुलाब बाबासाहेब फुलारे, संजय बाबूराव त्रिभुवन (दोघे रा. हनुमंतगाव, ता. वैजापूर) या दोघांना अटक करण्यात आली. नानासाहेब सोपान कर्डे, सचिन अशोक त्रिभुवन आणि रवी एकनाथ त्रिभुवन हे तिघे आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. 

हनुमंतगाव परिसरात वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून, सध्या हरणांचा वावर वाढला आहे. या पाच जणांनी गुरुवारी दुपारी दोन हरणांची शिकार करून पार्टी करण्याचा वस्तीवर बेत आखला. पार्टीची तयारी सुरू असतानाच याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर ग्रामस्थ व पोलीस सतर्क झाले. वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे, पोलीस उपनिरीक्षक ए.जी. नागटिळक, हवालदार खंडू मोरे, दीपक बर्डे, गणेश जाधव यांच्या पथकाने तातडीने वस्तीवर धाव घेतली. त्यावेळी हे पाच जण पार्टीची तयारी करीत होते. पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला. पोलीस व ग्रामस्थांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना पकडले. मात्र, तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.   दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले, वनरक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी पंचनामा करून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस व वन विभागाची कारवाई सुरू होती. 

तपासणीला पाठविणारपोलिसांनी घटनास्थळावरून हरणांचे मांस, हरणाला पकडण्यासाठी लावलेले जाळे, मटण शिजवण्यासाठी असलेले भांडे, दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडांचे तुकडे जप्त केले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. 

टॅग्स :forestजंगलPoliceपोलिसArrestअटकAurangabadऔरंगाबाद