शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला पेट्रोल टाकून जाळले; पेटलेल्या अवस्थेतच गाठले ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:38 IST

गंभीररीत्या जळालेल्या व्यक्तीला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देपेटलेल्या अवस्थेत पळत सुटले, लोकांनी विझविलेविश्रांती चौकातील कार्यालयात झाली घटना 

औरंगाबाद : भूखंड विक्रीच्या व्यवहारातील साडेतीन लाख रुपयांच्या वादातून तीन जणांनी एका प्लॉटिंग एजंटला त्यांच्याच कार्यालयात पेट्रोल टाकून जाळल्याची घटना विश्रांतीनगर चौकात गुरुवारी दुपारी घडली. गंभीररीत्या जळालेल्या व्यक्तीला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

शेषराव दगडू शेंगुळे (५४, रा. जयभवानीनगर) असे जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  शेषराव हे प्लॉटिंग एजंट, लेबर कॉन्ट्रॅक्टर, तसेच बायो सायन्स उत्पादन विक्रीचा व्यवसाय करायचे. विश्रांतीनगर चौकात साई इंटरप्रायजेस नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून ते त्यांचे सर्व व्यवहार करीत. शेंगुळे यांनी सुंदरवाडी शिवारातील त्यांचा प्लॉट स्वाती जाधव यांना साडेतीन लाख रुपयांत सहा महिन्यांपूर्वी विक्री केला होता. मात्र करारानुसार स्वाती यांचे सातबाऱ्यावर नाव आले नाही. यामुळे त्यांनी पैसे परत मागितले होते. त्यांना धनादेश दिले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेंगुळे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. तेव्हा गजानन जाधव, पप्पू सूर्यवंशी आणि स्वाती जाधव (सर्व रा. राजनगर, मुकुंदवाडी) तेथे आले. आमचे साडेतीन लाख रुपये आताच द्या म्हणत त्यांच्यासोबत वाद सुरू केला. हे भांडण सुरू असताना त्यांच्यापैकी गजाननने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल शेंगुळे यांच्या अंगावर टाकले. तर सूर्यवंशीने त्यांना पेटवून दिले. यावेळी स्वाती दारात उभी होती. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. अवघ्या मिनिटांत शेंगुळे यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यावेळी ते आरडाओरड करीत पेटलेल्या अवस्थेतच कार्यालयातून रोडपर्यंत बाहेर आले. यावेळी काही लोकांनी त्यांच्या अंगावर पाणी फेकल्याने त्यांच्या अंगाला लागलेली आग विझली. 

जबाब नोंदविल्यांनतर गुन्हायाविषयी सपोनि. सोनवणे म्हणाले की, साडेतीन लाख रुपयाच्या वादातून काही लोकांनी शेंगुळे यांना पेट्रोल टाकून जाळल्याची प्राथमिक माहिती आहे. याविषयी रात्री उशिरा पंचासमक्ष शेंगुळे यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला. याविषयी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सुरू होती.

दुकानदाराने दिले बेडशीटशेंगुळे यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे जळून खाक झाले आणि ते गंभीररीत्या जळाले. यावेळी त्यांच्या अंगावरील अंडरपॅण्ट अंगाला चिकटल्याने शेजारील एका दुकानदाराने कैचीने कापून अंडरपॅण्ट काढली. यानंतर त्यांना बेडशीट अंगाला गुंडाळण्यास दिले.

पायी गाठले पुंडलिकनगर ठाणेसंपूर्ण शरीर जळालेले असताना शेंगुळे हे कमरेला बेडशीट गुंडाळून पायी चालत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेले. ठाण्यात उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहताच लगेच मेडिकल मेमो तयार करून त्यांना पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात नेले.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस