शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

धक्कादायक ! पोलीस उपायुक्तांच्या केबिनमध्ये तक्रारदार महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:00 IST

आरोपींना वाळूज पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करून तक्रारदार महिलेने पोलीस उपायुक्तांसमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला

ठळक मुद्देमहिला आयुक्तालयात गेल्याचे कळताच आरोपींना अटकउपायुक्त निवेदन वाचत असताना महिलेने विषारी द्रव्य प्राशन केले

औरंगाबाद : धूलिवंदनाच्या दिवशी (दि.१०) मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपींना वाळूज पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करून तक्रारदार महिलेने पोलीस उपायुक्तांसमोर विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.१६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी महिलेला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.

दहेगाव येथील रहिवासी आरोपी ज्ञानेश्वर राऊत याने दि.१० मार्च रोजी सायंकाळी तक्रारदार महिलेच्या घरासमोर विनाकारण शिवीगाळ करून तिच्या तोंडात मारले. यावेळी पीडिता त्याला समजावत असतानाच तेथे आरोपी किरण राऊत, सावता राऊत आणि विक्रम राऊत हे आले. त्या सर्वांनी महिलेसह तिचे पती, दीर आणि जाऊ यांना घरात घुसून रॉड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी विक्रमने पीडितेचा ब्लाऊज फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपी जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विनयभंग करणे, मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कलमानुसार गुन्हा नोंद झाला होता. 

गुन्हा दाखल होऊन आज ६ दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. एवढेच नव्हे तर आरोपी विक्रम राऊत याने पीडितेला गाठून पुन्हा धमकी दिली होती. आरोपींकडून आपल्या कुटुंबाचे बरे वाईट होण्याची शक्यता असल्याने त्यांना तात्काळ अटक करावी, अशी विनंती तक्रारदारांनी वाळूज पोलिसांना केली होती. मात्र वारंवार विनंती करूनही पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार महिला, तिचा दीर आणि जावेसह दि.१६ मार्च रोजी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन घेऊन आले. पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. 

हे निवेदन उपायुक्त वाचत असतानाच पीडितेने स्वत:जवळील विषारी द्रव्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली. ती विष पीत असल्याचे तिच्या शेजारी बसलेल्या नातेवाईक आणि पोलिसांच्या लक्षात येताच तिच्या हातातील विषाची बाटली हिसकावण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपायुक्तांसह तिचे नातेवाईकही क्षणभर स्तब्ध झाले. यानंतर पीडितेला पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

महिला आयुक्तालयात गेल्याचे कळताच आरोपींना अटक दरम्यान, वाळूज पोलिसांनी आरोपी विक्रम राऊत, ज्ञानेश्वर राऊत, किरण राऊत आणि सावता राऊत यांना १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. आरोपी विक्रम राऊत हा माजी उपसरपंच असून, गावातील राजकीय वादातून हे भांडण झाले होते, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद