शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तस्करी; टोमॅटोच्या कॅरेटखाली लपवून आणला ९० लाखाचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:11 IST

ट्रकमध्ये दर्शनी भागात एकावर एक अशी टोमॅटोची २२५ कॅरेट रचलेली होती

ठळक मुद्देऔरंगाबाद ग्रामीण एलसीबीची कारवाई  ट्रकसह १ कोटी ३ लाखाचा मुद्देमाल जप्त 

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाने कृषी मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्याचा गैरफायदा घेत टोमॅटोच्या कॅरेटआडून  कर्नाटक राज्यातून ट्रकने आणलेला ९० लाखाचा गुटखा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडला. ही कारवाई झाल्टा फाट्याजवळ १४ मे रोजी रात्री उशीरा करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणाना अटक केली. सय्यद अकिल सय्यद अय्युब (३४,रा . सायकलपुरा, मलकापूर , जि . बुलढाणा) आणि शेख शफिक शेख कदीर (वय ३५, रा . पारपेठ , मलकापूर,बुलढाणा) अशी आरोपींची नावे आहेत. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, राज्यात गुटखाबंदी झाल्यानंतर पान टपरी आणि लहान मोठ्या किराणा दुकानात सहज गुटखा मिळतो . लॉकडाऊन  सुरू झाल्यापासून दुकाने बंद आहेत. मात्र चोरट्या मार्गाने आजही चढ्या दराने गुटखा विक्री केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कृषी मालाची वाहतूक करण्यासकेंद्र सरकारने परवानगी दिली . याचाच गैर फायदा घेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरच्या गुटखा तस्कराने टोमॅटोच्या कॅरेट खाली लपवून कर्नाटक राज्यातून ट्रकमधून गुटखा आणल्याची माहिती खबऱ्याने ग्रामीण पोलिसांना दिली. खबऱ्याने संशयित ट्रकची माहिती पोलिसांना दिल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील , अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक भागवत फुंदे , फौजदार संदीप सोळंके , कर्मचारीसय्यद झिया , गणेश मुळे , विक्रम देशमुख , दिपेश नागझरे , किरण गोरे , उमेश बकले , न्यानेश्वर धापसे ,प्रमोद साळवी आणि योगेश तरमळे यांच्या पथकाने १४ मे रोजी रात्री झाल्टा फाटा येथे सापळा रचून संशयित ट्रक पकडला. 

ट्रकच्या झडतीत फुटले बिंग पोलिसांनी संशयित ट्रक ची झडती घेतली असता ट्रकमध्ये दर्शनी भागात एकावर एक अशी टोमॅटोची २२५ कॅरेट रचलेली दिसली . या कॅरेट खालील प्लास्टिक ताडपत्रीच्या खाली गुटख्याच्या तब्बल ३०० गोण्या लपविण्यात आल्याचे दिसले या गुटख्याची बाजारातील किम्मत ९० लाख रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक फुंदे यांनी सांगितले . हा गुटखा आणि ट्रक असा सुमारे १ कोटी ३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला . चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस