शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 14:40 IST

बदनापूर येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार 

ठळक मुद्देया प्रकरणात विद्यापीठाने दस्तावेज मागविले आहेत अवैधरीत्या लाखोंचा लाभ मिळविला आहे

- राम शिनगारे 

औरंगाबाद : बदनापूर येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागातील दोनपैकी एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असताना त्या जागेवर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीची निवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी पुराव्यानिशी तक्रार बामुक्टो प्राध्यापक संघटनेने कुलगुरूंकडे केली आहे. यावर प्रशासनाने ११ सप्टेंबरपर्यंत मूळ कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहेत.

विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या मूळ नियुक्तीचा वाद विकोपाला गेला आहे. त्यावरून दररोज आंदोलने होत आहेत. त्यापूर्वी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे बामुक्टो प्राध्यापक संघटनेतर्फे बदनापूर महाविद्यालयातील गैरप्रकाराविषयी तक्रार दिलेली आहे. यानुसार कुलगुरूंनी न्यायालयीन चौकशी समितीही नेमलेली आहे. संघटनेच्या श्री निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात  शारीरिक शिक्षण विषयाच्या दोन जागांसाठी २३ जुलै १९९८ रोजी जाहिरात देण्यात आली होती. यातील एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होती. या जागेवर  डॉ. एस. एस. शेख यांची निवड करण्यात आली. नियुक्तीवेळी त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले होते. त्या आधारावर विद्यापीठ प्रशासनाने २१ आॅगस्ट १९९८ रोजी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. मात्र, डॉ. शेख यांनी त्यानंतर सर्व लाभ घेताना खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दाखविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार तत्कालीन सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी डॉ. शेख यांना सातव्या वेतन आयोगाचे  लाभ मूळ कागदपत्रे सादर केल्याशिवाय मंजूर करण्यास नकार दिला होता. मात्र, विद्यमान सहसंचालक डॉ. दिगांबर गायकवाड यांनी पदभार घेताच महाविद्यालयास भेट देत वादग्रस्त प्रकरण निकाली काढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने डॉ. शेख यांच्या नियुक्तीसंदर्भात ११ मुद्यांसंदर्भातील मूळ कागदपत्रे घेऊन ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

दुसऱ्या जागेवर पत्नीची निवडबदनापूर येथील महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागातील दोन जागांपैकी एका जागेवर डॉ. शेख यांच्या पत्नीची  निवड केलेली आहे, तर राखीव जागेवर डॉ. शेख यांची निवड केली. विद्यापीठ प्रशासन, सहसंचालक कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांत डॉ. शेख हे खुल्या प्रवर्गातून  नियुक्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, व्हाईटनर लावून कागदपत्रांत खाडाखोड केल्याचे बामुक्टो संघटनेतर्फे  केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संस्थाचालक साडू, प्राचार्य मेहुणी असल्यामुळे हा प्रकार आतापर्यंत चालला असल्याचेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.

माझी निवड खुल्या प्रवर्गातमाझी निवड खुल्या प्रवर्गात झालेली आहे. संघटना चुकीची कागदपत्रे देऊन दिशाभूल करीत आहे. माझ्याकडे असलेली कागदपत्रे खरी आहेत. शारीरिक शिक्षण संचालक पदावर नियुक्ती असून, पत्नीची निवड विषयासाठी झालेली आहे. त्यामुळे विद्यापीठाने कारवाई केल्यास पुढील मार्गाचा अवलंब केला जाईल, असे डॉ. एस. एस. शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :reservationआरक्षणEducationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद