शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:17 IST

कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली.

वाळूज महानगर : रांजणगाव येथील कपिल सुदाम पिंगळे या तरुणाच्या खूनप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचे उघडकीस आले आहे. रांजणगावच्या ‘त्या’ फरार राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपींची संख्या ६ झाली आहे.

हॉटेल-लॉजिंग व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (३१, रा. रांजणगाव) याचा गुरुवारी मध्यरात्री जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (२४, रा. बेगमपुरा) याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने खून केला. पोलिसांनी यश व त्याचे साथीदार भरत पंडुरे, विकास जाधव व सागर मुळे या चौघांना जालना येथे पकडले होते. कपिलने यशला ठार मारण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून ‘सुपारी’ घेतल्याचा संशय असल्याने यशने कपिलचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

कपिलचा खून करण्यासाठी यशने जालना येथील अमर ऊर्फ अतुल गणेश पवार याच्याकडून ५० हजारांत गावठी कट्टा विकत घेतला होता. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अमरच्याही मुसक्या बांधल्या होत्या. या ५ आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. खुनानंतर पसार झालेल्या त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरोपींची संख्या ६ झाली असून, पदाधिकाऱ्याच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केल्याचे पाटील यांनी सांगितले.

वाढीव कोठडी; ॲट्राॅसिटीचा गुन्हा५ आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या ५ आरोपींना वाढीव ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून आरोपींविरुद्ध ॲट्राॅसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.

वाळूज कपिल खून जोड-ठोंबरे, नंदवंशीचा शोध सुरूया पाच आरोपींना एक ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी दिले. न्यायालयात सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी युक्तिवाद केला. मुख्य आरोपी शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शे. पुंं., ता. गंगापूर) आणि खून केल्यानंतर आरोपींना शेंद्रा एमआयडीसी परिसरातून कारने माजलगावमार्गे नांदेडला नेणारा आरोपी शिव नंदवंशी, असे दोघे अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज