शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या ग्रुपवर पालकाने टाकली पोर्न लिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:51 IST

शैक्षणिक धडे देण्याचे काम सुरू असतानाच हर्सूल परिसरातील एका शाळेच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर खुद्द पालकाने अनेक अश्लील लिंक २० जून रोजी टाकल्या.

ठळक मुद्देलिंक शेअर झाल्यानंतर पालकाने मोबाईल बंद करून ठेवलाशेवटी मुख्याध्यापकाने पालकाचे घर गाठून त्याची खरडपट्टी काढली

औरंगाबाद : ऑनलाईन शिक्षणासाठी मुख्याध्यापकाने तयार केलेल्या एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर खुद्द पालकानेच अश्लील लिंक शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार २० जून रोजी घडला. हा खळबळजनक प्रकार समोर येताच मुख्याध्यापकाने सायबर  पोलीस ठाण्यात त्या पालकाविरुद्ध तक्रार केली.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक  नुकसान होऊ नये, म्हणून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळांनी आॅनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व शाळांच्या माध्यमातून पालकांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. शैक्षणिक धडे देण्याचे काम सुरू असतानाच हर्सूल परिसरातील एका शाळेच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर खुद्द पालकाने अनेक अश्लील लिंक   २० जून रोजी टाकल्या.

हा प्रकार काही पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या  पालकाच्या  मोबाईलवर अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्याने मोबाईल बंद करून ठेवला होता. इतर पालकांनी या घटनेबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांना माहिती देत फैलावर घेतले. त्यानंतर ही लिंक काढून टाकण्यासाठी आणि  जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापकांनीही ‘त्या’ पालकाशी संपर्क केला. मात्र, त्या पालकाने मोबाईल बंद केला. यामुळे मुख्याध्यापक आणखीनच संतापले. त्यांनी थेट त्या पालकाचे घर गाठून त्याची खरडपट्टी केली. त्यानंतर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील त्या  लिंक  काढून टाकण्यात आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांनी यासंदर्भात मंगळवारी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दाखल केला. याविषयी सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

टॅग्स :onlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण