शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धक्कादायक ! वृद्धेला गाठोड्यात बांधून विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 6:27 PM

crime news महिला मोलमजुरी करून उपजीविका भागवते असे

ठळक मुद्देआरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली

शिऊर : अंतर्गत वादातून शिऊर (ता. वैजापूर) येथे एका ५५ वर्षीय वृद्धेला साडीच्या गाठोड्यात बांधून विहिरीत फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रकला परसराम मोरे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष अंकुश पवार (३५) यास ताब्यात घेतले असून त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेतील त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.

शिऊरच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात राहणाऱ्या चंद्रकला मोरे मोलमजुरी करून  उपजीविका भागवत होत्या. त्यांचा मृतदेह बाजारतळ परिसरालगत विहिरीतील पाण्यात तरंगत असल्याचे बुधवारी नागरिकांना दिसले.  माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. तरंगत असलेले प्रेत दोरीच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. 

आरोपी व्यसनाधीनशिऊरच्या चंद्रकला परसारम मोरे यांच्या खून प्रकरणात गावातील सुभाष अंकुश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनाची त्याने कबुलीसुद्धा दिली. मात्र, सुभाष पवार दारूच्या आहरी गेलेला असून पोलिसांनी बुधवारी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी तो शुद्धीत नव्हता. त्यामुळे चंद्रकला मोरे यांचा खून नेमका कुठल्या कारणासाठी, तसेच कुणाच्या सांगण्यावरून केला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद