शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक निष्कर्ष; एक लाख शेतकऱ्यांना जगणं होतंय असह्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:55 IST

माजी आयुक्त केंद्रेेकर यांच्या पाहणीतील धक्कादायक निष्कर्ष

विकास राऊत 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील एक लाख शेतकऱ्यांना जगणे असह्य होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष माजी विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर यांच्या काळातील पाहणीतून पुढे आला आहे. केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे जानेवारी-२०२३ मध्ये करण्यास सुरुवात केली. 

१५ मेपर्यंत पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला होता. या सर्व्हेतील निष्कर्षाच्या संदर्भावरून शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला. केंद्रेकर ३ जुलैला कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी सर्व्हे अहवाल शासनाकडे दिला. १ लाख ५ हजार शेतकरी कुटुंब अतिसंवेदनशील असल्याचा निष्कर्ष त्यांनी दिला होता.  

सर्व्हे कसा ? n शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद, दुसरीकडे दहा लाख शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती भरून घेतल्याचा दावा. n मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओं, तलाठ्यांच्या पथकाने घरी जाऊन फॉर्म भरून घेतला. शेतकऱ्यांच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रश्नांचे बारा विभाग करून त्यामध्ये १०४ प्रश्नांची माहिती घेण्यात आली. 

समोर काय आले?  शेतकऱ्यांची खचलेली मानसिक स्थिती, बिकट आर्थिक परिस्थिती, सावकार व बँकांचे वाढलेले कर्ज. यातून निर्माण होणारे आत्महत्येचे विचार. काय करता येईल?

शेतकऱ्यांना दोन हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख द्यावे, तेलंगणाप्रमाणे नगदी पैसे मिळावे. शासनाकडून मदतीसाठी ४० हजार कोटींच्या आसपास रकमेची तरतूद करावी. ही मदत देताना किमान-कमाल एकरची अट काढावी. नुकसान भरपाई, विमा, ठिबक अनुदान बंद करावे, असेही अहवालात म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना महिन्याला ५,००० रुपये द्या : खडसे मुंबई : मराठवाड्यात १०० दिवसात १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विविध कारणांमुळे १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत. माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहिना ५०० रुपये देण्याऐवजी ५ ते ६ हजार रुपये द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली.  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, १२ तास वीज चालू करावी, कृषी विभागातील रिक्त ५० टक्के जागांची भरती करावी, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या. केंद्रेकर हे महसूल विभागात होते. महसूलला अहवाल दिला असेल तर तो मागवून घेऊ, असे यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत