शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धक्कादायक ! हजार रुपयात बोगस लस प्रमाणपत्र; सरकारी डॉक्टरच चालवायचा रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 14:52 IST

Corona Vaccination in Aurangabad: केवळ ६०० ते १००० रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाइंड शिवूर ( ता. वैजापूर ) येथील वैद्यकीय अधिकारी असल्याचे उघडकीस आले आहे.

औरंगाबाद : शहरात बोगस लस प्रमाणपत्र (Bogus vaccine certificate racket in aurangabad ) देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात जिन्सी पोलिसांनी मंगळवारी यश आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून प्लस रुग्णालयात छापा टाकून पोलिसांनी एका डॉक्टरसह दोघांना रंगेहाथ अटक केली. आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक बोगस लसीकरण प्रमाणपत्र आढळून आली आहेत. धक्कादायक म्हणजे, केवळ ६०० ते १००० रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाइंड शिवूर ( ता. वैजापूर ) ग्रामीण रुग्णालयात  कार्यरत वैद्यकीय अधिकारी असल्याचे उघडकीस आले आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination in Aurangabad ) कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अनेक सुविधा देण्यात येणार नाहीत, तसेच १५ डिसेंबरपासून दंड लावण्यात येणार आहे. यामुळे अनेकजण यातून पळवाटा शोधत बोगस प्रमाणपत्र काढत असल्याची गुप्त माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे रॅकेटमधील काही जणांशी संपर्क केला. लस न घेता प्रमाणपत्र देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. यानंतर जिन्सी पोलिसांच्या पथकाने प्लस हॉस्पिटल ( व्हीआयपी फंक्शन हॉल जवळ ) येथे छापा टाकला. यावेळी येथील डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली. तिघांच्या मोबाईलमध्ये अनेकांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. लसीकरणातील ही बोगसगिरी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

वैद्यकीय अधिकारी रॅकेटचा सूत्रधार प्लस हॉस्पिटल येथील डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक हे तिघे वैजापूर तालुक्यातील शिवुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन यास आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक पाठवत असत. यानंतर तेथे कार्यरत सिस्टर आढाव व शहेनाज शेख यांनी लस दिल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्यात येत होते. ही कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपयुक्त दीपक गीऱ्हे, सपोआ निशिकांत  भुजबळ, जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोह शेख गाणी, पोहकॉ जगताप, पोना परदेशी, पोना जफर पठाण, पोशि बमनात, पोकॉ सरिता कुंडारे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद