शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

धक्कादायक : औरंगाबाद जिल्ह्यात चाईल्डलाईनने रोखले ८ मुलींचे बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:47 IST

अल्पवयीन मुलींना अडकविले जाते विवाहबंधनात

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : बिहार, राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण जास्त आहे, असे म्हटले जाते. मात्र, आता त्यात औरंगाबादही मागे राहिलेले नाही. येथे शाळेत शिकत असतानाच मुलींचे लग्न लावून दिले जात आहे. धक्कादायक, बाब म्हणजे या लग्नात हजर गावकऱ्यांची याला मूकसंमती मिळत आहे. चाईल्डलाईनने मागील ६ महिन्यांत ८ मुलींना बालवधू बनण्यापासून रोखले. यामुळे अनेक वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. 

२४ एप्रिल रोजी चाईल्डलाईनला १०९८ या टोलफ्री क्रमांकावर फोन आला की, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे १५ वर्षांच्या मुलीचे लग्न लावून देण्यात येत आहे. लगेच ग्रामीण पोलिसांच्या मदतीने चाईल्डलाईनचे सामाजिक कार्यकर्ते पथक लग्नस्थळी पोहोचले. त्याठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला होता. नवरदेवाला घेऊन वरात मारुतीरायाच्या दर्शनाला गेली होती. वधू अल्पवयीन असल्याने पोलीस विवाहस्थळी आले ही बातमी मंदिरापर्यंत पोहोचताच नवरदेवासह सर्व वऱ्हाडी तेथून गायब झाले. लग्नमंडपात अल्पवयीन वधू तिचे आई-वडील व अन्य वऱ्हाडीमंडळी हजर होते. पोलिसांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले, तसेच अल्पवयीन मुलांचे लग्न लावणे गुन्हा असल्याचेही निदर्शनात आणून दिले. त्यानंतर वर मंडळीच्या सहमतीने हा बालविवाह रोखण्यात आला.

ही जिल्ह्यातील पहिली घटना नसून मागील ६ महिन्यांत ८ अल्पवयीन मुलींचे लग्न रोखण्यात चाईल्डलाईनला यश आले. कन्नड, वैजापूर, फुलंब्री, सोयगाव, गोपाळपूर, सटाणा (करमाड), पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे लग्न लागणार होते. सर्व मुलींचे वय १५ ते १७ आहे, तर वराचे वय २० ते २५ दरम्यान होते. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्यात येत आहे. निनावी फोनमुळे असे प्रकार उजेडात येतात; पण असे अनेक विवाह होत आहेत ज्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचतच नाही. ग्रामीण भागात मागील दोन वर्षांत झालेल्या लग्नामधील अनेक विवाहिता बालवधू आहेत.

मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी सांगितले की, बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही सर्रासपणे शालेय मुलींचे लग्न लावले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वधूचे वय कमी आहे हे माहीत असतानाही गावकरी या लग्नात सहभागी होतात. कायद्यानुसार लग्न लावून देणारे व सर्व उपस्थित असणारे सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र, या कायद्याला न जुमानता अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिले जात आहे. 

काय होऊ शकते शिक्षा- १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूसोबत विवाह केल्यास त्या पुरुषाला २ वर्षे सक्तमुजरी व १ लाख रुपये दंड - जाणीवपूर्वक बालविवाह ठरविल्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास २ वर्षे सक्तमुजरी आणि १ लाख रुपये दंड होऊ शकतो. - बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधू यांचे आई-वडील अन्य नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व ज्यांनी  विवाह घडविण्यास मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केला नाही. सर्वांना २ वर्षे सक्तमजुरी, १ लाख रुपये दंड. 

कोणाला होऊ शकते शिक्षा१) जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणारे.२) सोहळा पार पाडणारे.३) प्रोत्साहन देणारे वर-वधूचे आई-वडील किंवा पालक.४) नातेवाईक, मित्रपरिवार, विवाह होण्यास प्रत्यक्ष मदत करणारे.५) बालविवाह न होण्यासाठी प्रयत्न न करणारे, विवाहात सामील होणारे. 

बालविवाहाला प्रतिबंध करण्याची जबाबदारी कोणाची  १) गावपातळीवर- ग्रामसेवक २) तालुका पातळीवर- तहसीलदार, पोलीस निरीक्षक३) जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी४) जिल्हा पातळीवर-जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक

बालविवाहाची माहिती चाईल्डलाईनला कळवालहान मुला-मुलींच्या हक्कासाठी त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी चाईल्डलाईन ही संस्था देशभर काम करीत आहे.  आपल्या गावात बालविवाह होत असेल, तर त्याची माहिती चाईल्डलाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. - अप्पासाहेब उगले, सचिव तथा प्रकल्प संचालक, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था

टॅग्स :Familyपरिवारmarriageलग्नAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस