शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अबब...! औरंगाबादमध्ये १ लाख २३ हजार अनधिकृत नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:17 IST

चार वर्षांपासून नळधारकांचा अधिकृत, अनधिकृत आकडा मनपाकडे नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला होता.

ठळक मुद्देएसीडब्ल्यूयूसीएलच्या कचाट्यातून डाटा मनपाला मिळालाकंपनीने अनधिकृत कनेक्शनचे सर्वेक्षण करून कोर्टात दिले होते शपथपत्र

औरंगाबाद : महापालिकेला समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या एसीडब्ल्यूयूसीएल कंपनीकडून शहरातील नळधारकांचा डाटा चार वर्षांनी मिळाला आहे. १ लाख ३० हजार अधिकृत आणि १ लाख २३ हजार अनधिकृत अशा २ लाख ५३ हजार नळजोडण्या शहरात असल्याच्या धक्कादायक अहवालाचे सादरीकरण करून कंपनीने मनपाकडे डाटा सोपविला आहे. आता कंपनीने दिलेली अनधिकृत नळधारकांची आकडेवारी खरी की खोटी हे पालिकेला तपासावे लागणार आहे.  चार वर्षांपासून नळधारकांचा अधिकृत, अनधिकृत आकडा मनपाकडे नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला होता. आता डाटा मिळाल्यामुळे वसुली वाढण्याचा दावा केला जात आहे. 

कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात नळजोडण्याच्या पूर्ण माहितीचे सादरीकरण करून ती माहिती पालिकेला दिली. गुरुवारी महापौर दालनात झालेल्या आढावा बैठकीत कंपनीने डाटा दिल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. २०१६ मध्ये एसपीएमएल आणि एसीडब्ल्यूयूसीएलसोबतचा करार मनपाने रद्द केला होता. दरम्यान आजवरच्या काळात कंपनी आणि मनपात कोर्टकचेरी, लवादापर्यंतचे प्रकरण घडले. या सगळ्या प्रकरणात २९ कोटी ६७ लाख रुपये तडजोड रक्कम पालिकेने कंपनीला देण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना गेल्या महिन्यात दिल्यानंतर आयुक्तांनी कंपनीकडून नळजोडण्या आणि पाणीपट्टीबाबतचा डाटा मिळाल्यानंतरच त्यांना दाव्याची रक्कम देण्याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता कंपनीने अधिकृत आणि अनधिकृत असा दोन्ही डाटा मनपाला दिला आहे.

अनधिकृत नळ रेकॉर्डवर घेणार २ लाख ५३ हजार नळधारकांचा डाटा पालिकेला मिळाल्याने पाणीपट्टी वसूल करणे सोपे होईल, असा दावा केला जात आहे. प्रभागनिहाय किती अनधिकृत व अधिकृत नळजोडण्या आहेत, याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे आली आहे. नळधारकांचा सर्व डाटा प्रभाग कार्यालयांकडे वितरित केला आहे. त्यानुसार आता नागरिकांना पाणीपट्टीच्या डिमांड नोटीस (करमागणी) पाठविल्या जाणार आहेत. तसेच अनधिकृत नळांवर कारवाई करून त्यांना रेकॉर्डवर घेतले जाईल, असा दावा महापौरांनी केला.

कंपनीने केले होते सर्वेक्षणऔरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठा आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असताना १ लाख ३० हजार नळजोडण्या अधिकृत होत्या. कंपनीने पाहणी करून १ लाख २३ हजार बेकायदा नळजोडण्या शोधल्या होत्या. कंपनीने तसे शपथपत्रही न्यायालयात त्यावेळी सादर केले होते. आता त्यानुसार महापालिका अनधिकृत नळधारकांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी