शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! उपोषणकर्त्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:03 IST

याबाबतच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सिल्लोड: अंधारी येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू होते. बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एका जीपने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याबाबतच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र मेवालाल वानखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दादाराव वानखेडे, लताबाई दादाराव वानखेडे, ज्ञानेश्वर तायडे, विजय नामदेव गोरे, शकील पटेल व इतर 15 ते 20 गावकरी विविध मागण्यांसाठी 4 मार्च पासून उपोषण करत होते. रात्री सर्व उपोषण करते झोपले होते. यावेळी उपोषणस्थळाकडे एक जीप भरधाव वेगात आली. रवींद्र वानखेडे यावेळी जागे असल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने उपोषणकरते जागे झाले यामुळे सर्वजण बचावले. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नामदेव तायडे, श्याम भगवान सोनवणे, नवनाथ भगवान तायडे, अंकुश तुळशीराम तायडे, विठ्ठल भीमराव तायडे, विनोद बाबूलाल तायडे सर्व रा.अंधारी असे आरोपींची नावे आहेत.

काय होते प्रकरणजातवाशिव ते लोणवाडीशिव भोर्डी नदीचे चौदावा वित्त आयोगातून झालेल्या खोलीकरणाच्या कामाचे मूल्यांकन करणे. राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत सण २०१३ मध्ये झालेल्या  भ्रष्टाचाराची चौकशी करून समितीचे अध्यक्ष व सर्व समिती सदस्य, गुत्तेदार व संबंधित शासकीय अधिकारी यांची चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात यावा, अपूर्ण काम पूर्ण करून गावात पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. भ्रष्टाचार झालेला शासकीय निधी वसूल करण्यात यावा, विद्यमान सरपंच विजय नामदेव गोरे व सदस्य यांच्यावरील चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, माजी सभापती लताबाई वानखेडे, मजूर फेडरेशन चे संचालक दादाराव वानखेडे, सरपंच  विजय गोरे, ग्रामपंचायत सदस्य व इतर 15 ते 20 ग्रामस्थांनी उपोषण केले. 

चौकशीचे आश्वासन दिल्याने सुटले उपोषण गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उपजिल्हाधिकारी डॉ.सुनील भोकरे,  गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे,सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक किरण बिडवे यानी गुरुवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन चौकशी करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर  गुरुवारी रात्री उपोषण सोडण्यात आले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसagitationआंदोलन