शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात जिथे ग्राहकांचे होते तक्रार निवारण; तिथेच कर्मचाऱ्यांचे मद्यप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:36 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील तीन सदस्य जिथे सुनावणी घेतात, तेथेच पार्टी रंगल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसते आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात तेथील कर्मचारीच ओली पार्टी करतानाचा सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील एका कक्षात मद्यासह इतर पदार्थांची रेलचेल असलेली ओली पार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयाला हा सगळा प्रकार लेखी पत्राद्वारे कळविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील तीन सदस्य जिथे सुनावणी घेतात, तेथेच पार्टी रंगल्याचे एका बांधकाम व्यावसायिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसते आहे. तो व्हिडीओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.

आयोगाच्या कार्यालयात ग्राहकांशी संबंधित दावे दाखल करून घेत त्यावर सुनावणी घेतली जाते. मात्र, या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्या कक्षात ओली पार्टी केल्याने या कार्यालयात नेमके चालते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम व्यावसायिक सतीश राणे यांनी चित्रित केलेल्या व्हिडीओमधून हा प्रकार समोर आला.

आयोगाला जिल्हा प्रशासनाचे पत्रजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यालय आहे. तेथे न्यायालयीन कामकाज चालते. त्याचे नियंत्रण मुंबई आयोगाकडे आहे. आयोगाच्या अध्यक्षांना घडलेल्या प्रकरणाबाबत पत्र दिले आहे. त्यांना तातडीने कळविले असून, यावर तेच निर्णय घेतील.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल