शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पायाखालची जमीनच सरकली! अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर...पालकांचा विश्वासच बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:35 IST

अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर, हे कसे शक्य ?  मराठवाड्यातून वर्षाला १८० कर्करोगग्रस्त बालरुग्ण उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या १३ महिन्यांच्या बाळापासून ते २ वर्षे, ४ वर्षे वयाच्या मुलांना कॅन्सरचे निदान झाले आहे. कॅन्सर म्हटले की मुलांना असे काही होऊ शकते, यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. ‘डाॅक्टर हे कसे शक्य आहे? परत तपासणी करा’, असे काहीजण म्हणतात. तर काही जण डाॅक्टरच बदलतात. मराठवाड्यातून वर्षाला जवळपास १८० कर्करोगग्रस्त बालरुग्ण उपचारासाठी शहरात दाखल होतात. यातील ८० टक्क्यांवर मुले बरी होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

गेल्या काही वर्षांत बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मराठवाड्यातून शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयासह (राज्य कर्करोग संस्था) खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कर्करोगग्रस्त बाल रुग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, बाल कर्करोग विभागप्रमुख डाॅ. अदिती लिंगायत यांच्यासह येथील डाॅक्टर, परिचारिका उपचारासाठी परिश्रम घेतात. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शनिवारी कॅन्सरमुक्त झालेल्या रुग्णांनी, कुटुंबीयांनी मनोगत व्यक्त केले.

कुटुंबीयांसाठी धक्काच४ वर्षांच्या मुलीला कॅन्सरचे निदान झाले. कुटुंबीयांना धक्काच बसला. घरात यापूर्वी कुणालाही हा आजार नव्हता. यावर उपचारच नाही, असा समज होता. परंतु यावर उपचार असल्याचे कळल्याने मनोबल वाढले.- एक पालक

परभणीहून शहरातअडीच वर्षांच्या पुतण्याला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी परभणीहून शहरात ये-जा करतो. या आजाराविषयी सुरुवातीला खूप भीती हाेती. परंतु आता भीती वाटत नाही.- कर्करोगग्रस्त बालकाचे नातेवाईक

उपचाराने फरक६ वर्षांपूर्वीच १२ वर्षांच्या मुलाला कॅन्सरचे निदान झाले आहे. आधी तर पायाखालची जमीनच सरकली होती. परंतु उपचारामुळे फरक पडत आहे. त्यामुळे हा आजार सर्दी-खोकल्याप्रमाणे वाटू लागला आहे.- अन्य एक पालक, रा. देवळाई

बरे होण्याचे प्रमाण अधिक१७ महिन्यांच्या बाळालाही कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सरची भीती बाळगता कामा नये. कर्करोगग्रस्त बालरुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.- डाॅ. तुषार इधाटे, बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ.

English
हिंदी सारांश
Web Title : Ground Shakes: Cancer Strikes Babies, Parents in Disbelief, Hope Remains

Web Summary : Marathwada sees rising childhood cancer cases. Parents struggle with disbelief, seeking second opinions. Annually, 180 children seek treatment, with 80% recovering. Doctors emphasize early intervention and positive outcomes, offering hope to affected families.
टॅग्स :cancerकर्करोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर