ट्रकच्या धडकेत एक जागीच ठार
By Admin | Updated: December 18, 2014 00:35 IST2014-12-18T00:16:11+5:302014-12-18T00:35:12+5:30
जालना : शहरातील मंठा-अंबड वळण रस्त्यावर कुंडलिका नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वैद्य वडगाव (ता.मंठा) येथील प्रदीप गणेश वैद्य हे जागीच ठार झाले

ट्रकच्या धडकेत एक जागीच ठार
जालना : शहरातील मंठा-अंबड वळण रस्त्यावर कुंडलिका नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वैद्य वडगाव (ता.मंठा) येथील प्रदीप गणेश वैद्य हे जागीच ठार झाले. अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हा प्रकार १६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता घडला. याप्रकरणी बुधवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंठा तालुक्यातील वैद्यवडगाव येथील तिघे जण नव्याकोऱ्या दुचाकीवरून जालना येथे येत असतांना जिल्हा परिषदेत जाण्यासाठी मंठा-अंबड वळण रस्त्याने जात होते. कुंडलिका नदीवरील पुल ओलांडल्यानंतर गारपीर दर्गाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक प्रदीप वैद्य हे जागीच ठार झाले. त्यांचे सहकारी प्रकाश भानदास वैद्य व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. दोघाही जखमींना तात्काळ सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सहायक निरीक्षक सय्यद यांनी सांगितले, बिना क्रमांकाच्या दुचाकीवरून तिघेजण मंठाहून जालना जिल्हा परिषदेत खाजगी कामानिमित्ताने येत होते. वळण रस्त्यावर ट्रक चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. हा अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळापासून पळवून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार पी.एन. जऱ्हाड यांनी दिली.
विवाहितेची आत्महत्या
मंठा : तालुक्यातील उटवद येथील सुनिता राजाभाऊ सरोदे (३५) या विवाहितेने घरातील छळाता दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता घडली.
पोलिस पाटलांच्या खबरीवरून मंठा ठाण्यात अकस्मीक मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर महिलेला दोन मुली व दोन मुले आहेत. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)४
जालना : औरंगाबाद येथील शैलेश अजय बेंजामीन याने पहिली पत्नी जिवंत असतांना चंदा या महिलेसोबत दुसरा विवाह केला. पहिली पत्नी अनिता हिस मारहाण करून घरातून हाकलून दिले. तिला माहेराहून दीड लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण करून त्रास दिला.
४अनिता या महिलेचा शैलेस सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी १ जुलै २०१४ पासून माहेराहून मोटारसायकल घेण्यासाठी व बहिणीच्या लग्नासाठी दीड लाख रूपये घेऊन ये, म्हणून त्रास देण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेच दुसरे लग्नही उरकले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात आरोपी शैलेंद्र अजय बेंजामीन, अजय अलबर्ट बेंजामीन, शैला अजय बेंजामीन, नेहा अजय बेंजामीन, निशा अजय बेंजामीन व चंदा शैलेश बेंजामीन यांच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास जमादार अजय राजूपत करीत आहेत.