शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:59 IST

ही जमीन कोणत्याही सामान्य कुटुंबाची नाही तर एकेकाळी हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग कुटुंबाची आहे. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या कारचालकाच्या नावावर १५० कोटी रुपयांची जमीन नोंदणीकृत झाली आहे. ती 'बक्षिसपत्र' म्हणून नोंदणीकृत झाली आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. खासदाराच्या ड्रायव्हरला इतक्या मोठ्या रकमेची जमीन त्याच्या नावावर का नोंदणीकृत झाली असेल? ड्रायव्हरचे नशीब एका रात्रीत बदलल्याच्या या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. 

नोंदणीकृत झालेली जमीन कोणत्याही सामान्य कुटुंबाची नसून एकेकाळी हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग कुटुंबाची आहे. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे आणि खासदाराच्या ड्रायव्हरचे सालार जंग कुटुंबाशी काय संबंध आहे याचा तपास सुरू आहे. 

Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं

चालक जावेद रसूल शेख गेल्या १३ वर्षांपासून खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांची गाडी चालवत आहे. या प्रकरणावर चालक जावेद रसूल शेख याने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे'. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जावेद रसूल म्हणाले की, सालार जंग कुटुंबाशी माझे खूप चांगले संबंध आहेत. म्हणूनच त्यांनी मला ही जमीन  'बक्षिसपत्र' म्हणून दिली आहे. ही जमीन जालना रोडवरील दाऊदपुरा परिसरात आहे, ही एक अतिशय महत्त्वाची जागा आहे. दरम्यान,आता या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात चालक जावेदला समन्स बजावण्यात आल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले. परभणी येथील एका वकिलाने या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर समन्स बजावण्यात आले आहेत. वकिलांनी सांगितले की, कोणीही ड्रायव्हरला इतकी महागडी आणि उत्तम ठिकाणची जमीन का भेट देईल? अशा परिस्थितीत या बक्षिसपत्राची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी मीर मजहर अली खान आणि सालार जंग कुटुंबातील इतर ६ सदस्यांशी संपर्क साधला आहे. या बक्षिसपत्राबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

चालकाबाबत असलेल्या गोष्टी आम्हाला माहित नाहीत- विलास भुमरे

या प्रकरणावर खासदार संदीपान भूमरे यांच्या मुलाने विलास भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली. विलास भुमरे म्हणाले की, हे प्रकरण ड्रायव्हरशी संबंधित आहे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माझीही चौकशी केली आहे. जावेद आमचा ड्रायव्हर असला तरी त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींवर आमचे नियंत्रण नाही. सालार जंग कुटुंबाशी संबंधित अनेक लोकांनी हैदराबादच्या निजामाजवळ काम करत होते. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन आणि इतर संस्था आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाSandipan Bhumreसंदीपान भुमरे