शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर युटिलिटी कंपनीला महावितरणचा शॉक

By admin | Updated: June 22, 2016 01:03 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला महावितरणने जोराचा शॉक दिला आहे. महावितरणने युटिलिटी कंपनीला

सुनील कच्छवे , औरंगाबादशहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला महावितरणने जोराचा शॉक दिला आहे. महावितरणने युटिलिटी कंपनीला सवलतीच्या दराऐवजी व्यावसायिक दराने वीज बिलाची आकारणी सुरू केली आहे. एवढेच नाही तर युटिलिटी कंपनीकडून मागील दोन वर्षांतील वीज बिलाच्या फरकाची रक्कमही वसूल केली जाणार आहे. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी युटिलिटी कंपनीला तब्बल ७७ कोटी रुपयांचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावली आहे.औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याकरिता महानगरपालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. मनपाने ही यंत्रणा १ सप्टेंबर २०१४ पासून सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित केली आहे. मनपाने समांतर जलवाहिनी योजनेसाठी या कंपनीशी करार केलेला आहे. समांतरच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामाबरोबरच पाणीपुरवठा, पाणीपट्टी वसुली ही कामेही कंपनीकडून केली जात आहेत. पाणीपुरवठा यंत्रणेसाठी मनपाने महावितरणकडून पैठण, फारोळा, नक्षत्रवाडी या ठिकाणी तसेच शहरतील विविध भागात विद्युत कनेक्शन घेतलेले आहेत. त्यासाठी महावितरणकडून आतापर्यंत सवलतीच्या दरात वीज बिल आकारणी केली जात होती. मात्र सिटी वॉटर युटिलिटी ही खाजगी कंपनी असल्यामुळे महावितरणने आता कंपनीला व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यास सरुवात केली आहे. सिटी वॉटर युटिलीटी ही खाजगी कंपनी असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीला मनपाप्रमाणेच सवलतीच्या दरात वीज शुल्क आकारले जात होते. आता महावितरणने कंपनीने १ सप्टेंबर २०१४ पासून आतापर्यंतच्या विद्युत बिलातील फरकातील रक्कमही युटिलिटी कंपनीकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या कार्यालयातून वॉटर युटिलिटी कंपनीला मागील फरकाच्या रकमेचा भरणा करावा म्हणून नोटीस बजावली आहे. महावितरणने फरकाची रक्कम ७७ कोटी रुपये दाखविली आहे. त्यामुळे वॉटर युटिलिटी कंपनीला मोठा शॉक बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा योजनांच्या विद्युत कनेक्शनसाठी सवलतीच्या दराने वीज बिल आकारले जाते. पाणीपुरवठा योजनांचा मालक किंवा देखभालकर्ता शासकीय यंत्रणा असेल तरच ही सवलत लागू होते. ४महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमात तशी तरतूद आहे; परंतु इथे पाणीपुरवठा योजनेची देखभाल खाजगी संस्थेकडून केली जाते. त्यामुळे महावितरणने युटिलिटी कंपनीला व्यावसायिक दराने वीज आकारण्याचा निर्णय घेतला आहे.सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला आतापर्यंत मनपाच्याच दराने वीज बिल आकारले जात होते. आता त्यांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारले जात आहे. तसेच त्यांना मार्च २०१६ पर्यंतची फरकाची सुमारे ७७ कोटी रुपयांची रक्कमही भरण्यास सांगण्यात आली आहे. काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्यामुळे आम्ही याबाबतचा प्रस्ताव आमच्या मुख्य कार्यालयाकडेही पाठविला आहे. अंतिम निर्णय मुख्य कार्यालयाकडूनच होईल. - सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरणशहराच्या हद्दीत युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठ्यासाठी सहा कनेक्शन घेतलेले आहे. त्या सर्वांना चार महिन्यांपासून व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यात येत आहे. आधीच्या फरकाची रक्कमही त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असून त्यासाठी नोटीस बजावली आहे. - दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता, महावितरण