भरतभेटीनिमित्त शोभायात्रा
By Admin | Updated: October 6, 2014 00:11 IST2014-10-06T00:00:45+5:302014-10-06T00:11:54+5:30
हिंगोली : शहरामध्ये ऐतिहासिक दसरा महोत्सवांतर्गत ४ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी भरत भेटीचा कार्यक्रम पार पडला.

भरतभेटीनिमित्त शोभायात्रा
हिंगोली : शहरामध्ये ऐतिहासिक दसरा महोत्सवांतर्गत ४ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी भरत भेटीचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त शोभायात्रा काढून श्रीराम राज्याभिषेकाने वृंदावन धाम येथील रामलिला मंडळीतर्फे ९ दिवस सादर झालेल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शहरातील रामलीला मैदानावर भरतभेटीनिमित्त श्री हनुमानाच्या मुर्तीचे टाळ मृंदग व विणेकरांच्या निनादात पूजन करण्यात आले. या प्रसंगी ओमप्रकाश बियाणी, शांतीलाल जैन, नारायण बांगर, गणेश साहू, राधेशाम बोरा, गोपाल अग्रवाल, विजय मोकाटे, नागोराव लोखंडे, पुरूषोत्तम पांडे, दत्तराव पवार, सुभाष घुगे, नामदेव जगताप, शेषराव घुगे, अरुण कुरवाडे, देवराव दिंडे, संभाजी शिंदे, पांडुरंग पवार, नितीन शिंदे, सीताराम पुरी, बालाजी जाधव, देवराव जाधव, माधव पुरी, माधव थोरात, लक्ष्मण गायकवाड, रमेश भडंगे, हरिभाऊ कदम, पंडिता चिवडे, केशव थोरात, रत्नाकर गव्हाणकर, सुभाष कुरवाडे आदी उपस्थित होते. त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आकर्षक रथात राम, लक्ष्मण, जानकी व हनुमानाच्या वेषातील कलावंत तसेच हत्ती व घोड्यावर गुरू वशिष्ठ, भरत व शत्रुघ्न विराजमान झाले. श्री हनुमानाच्या मुर्तीसमोर वाजंत्री व भजनी मंडळाचा गजर सुरू होता. यासाठी कुंडलिकराव भजने, संजय लोहगावकर, विश्वास नायक, गणेश साहू आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)