शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षण - मनोज आखरे
By Admin | Updated: August 28, 2014 00:00 IST2014-08-27T23:53:32+5:302014-08-28T00:00:16+5:30
नांदेड : शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षणाची खरी लाट तयार झाली, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.

शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षण - मनोज आखरे
नांदेड : युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी काढलेल्या शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षणाची खरी लाट तयार झाली, या दबावामुळेच शासनाला मराठ्यांना आरक्षण देणे भाग पडले, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.
मराठा समाजाचा ई़एस़बी़सी मध्ये समावेश करून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी येथील डॉ़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. मराठा समाजातील सर्वच संघटनांनी आरक्षणासाठी लढा दिला परंतु आरक्षणाची एकत्र मोर्चेबांधणीची ताकद युवराज संभाजी राजे व मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वामुळेच तयार झाली. आरक्षणाचा लढा संपलेला नसून केंद्रातील ओबीसीत आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे आखरे म्हणाले.
ब्रिगेडीयर सुधीर सावंत म्हणाले, यश समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यामुळे तसेच मराठा समाजातील विविध संघटनाच्या लढ्यामुळे मिळाले आहे. आरक्षणाच्या लढ्यात वेगवेगळ््या संघटनेतील सहभागी झालेल्या कार्यकर्त्यावरील गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, असे म्हटले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार तर शिवराज्य पक्षाचे संस्थापक ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, आ़ओमप्रकाश पोकर्णा, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे, प्राग़णेश शिंदे, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डेे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, डॉ.रेखा पाटील, श्यामसुंदर शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती़ आरक्षणाच्या लढ्यासाठी योगदान देणाऱ्या समाजबांधवाचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष (उत्तर) संतोष गव्हाणे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) माधव देवसरकर, जिल्हा सचिव मारुती देशमुख नरंगलकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष संकेत पाटील, अवधूत कदम, गजानन कहाळेकर, भगवान कदम, मनोरमा चव्हाण, राजश्री मिरजकर, प्रा.मुकुंद कवडे, नागोराव भांगे, संदीप चव्हाण, संभाजी जाधव, बाळासाहेब देसाई, कार्तिक मुसळे, गजानन इंगोले, सुरेश मोरे, बालाजी शिंदे, तिरूपती हिवराळे, शहानंद मुधळ, किरण गव्हाणे, धनंजय सूर्यवंशी, बालाजी थडके, शिवहरी गाढे, शाम पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले.
प्रास्ताविकात संतोष गव्हाणे म्हणाले, आरक्षणासाठी अनेक समाजबांधव जखमी झाले असून त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. शिवशाहू रथयात्रेमुळे शासनावर दबाव आल्यानंतरच आरक्षण जाहीर केल्याचे ते म्हणाले. माधव देवसरकर यांनी सर्व समाजबांधवाच्या लढ्यामुळेच आरक्षण पदरात पडल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)