शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:49 IST

एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

प्रसाद कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चेएसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’चे ब्रीदवाक्य मिरविणाºया एस. टी. ने ‘शिवशाही’च्या ‘आॅनलाईन बुकिंग’ची सोय केली आहे. औरंगाबाद येथील बुद्धिबळप्रशिक्षक एस. के. कुलकर्णी यांनीही गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्यासाठी एस.टी. च्या संकेतस्थळावर वेळापत्रक पाहून ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीटखरेदी केले. ते त्यांच्या नातवासह सिडको बसस्थानकावर सकाळी सव्वाआठ या नियोजित वेळेनुसार आले. पण या बसबाबत चौकशी केली असता अशी कोणतीही ‘शिवशाही’ त्यावेळी नसल्याचे सांगण्यात आले. चौकशी कक्षातील कर्मचाºयाने त्यांना, वेबसाईटवर ही चुकीची बस दाखवली गेली असल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षाने कुलकर्णी यांना अकोल्यापर्यंत जाणा-या ‘शिवशाही’त बसवून दिले; इतकेच नव्हे तर अकोल्याच्या नियंत्रण कक्षास एक पत्र देऊन त्यांच्या नागपूर प्रवासाची सोय करून देण्याची सूचना केली. मात्र कुलकर्णी यांनी पूर्ण प्रवासाचे ‘शिवशाही’ चे पैसे भरूनही त्यांना अकोला ते नागपूर हा प्रवास साध्या बसने करावा लागला.जी गाडी रद्द केली, त्याची माहिती संबंधित प्रवाशापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था का केली गेली नाही? अशा प्रकारामुळे होणाºया मानसिक त्रासाचे काय, असे प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले.आगारप्रमुख म्हणतात, समन्वयाचा अभावकोणतीही बस बंद करण्याआधी वेबसाईटवर एक महिना आधी तशी दुरुस्ती केली जाते. या घटनेत सदर प्रवाशाने बरेच दिवस आधी बुकिंग केली असावी व दरम्यान ही बस बंद झाली असावी. एस.टी. तील दोन विभागांच्या असमन्वयामुळे हे घडू शकते, अशी प्रतिक्रिया औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रमुख श्रीकृष्ण मुंजाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. अशा कारणामुळे कोणाचा प्रवास रद्द झाल्यास त्यांनी दोन दिवसांच्या आत राज्यातील कोणत्याही आगारात तिकिटासह संपर्क साधावा. पडताळणी करून पैसे ‘आॅनलाईन’ परत केले जातात, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीAurangabadऔरंगाबादonlineऑनलाइनMarathwadaमराठवाडाstate transportएसटी