लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे भाजप आ. प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालून खुर्च्यांची तोडफोड करणाºया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रांजणगाव शेणपुंजी येथे झोका खेळताना भिंत पडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायततर्फे ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आ. बंब यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी मृत्यू झालेल्या दोघांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कैलास हिवाळे, लक्ष्मण साध्ये, प्रदीप सवई, रावसाहेब भोसले, साईनाथ गवळी, सतीश अग्रवाल, काँग्रेसचे काकासाहेब कोळसे, भीमराव मोरे यांच्यासह २० कार्यकर्त्यांनी आ. बंब यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. यात ग्रामपंचायतीच्या १५ खुर्च्यांची तोडफोड झाली. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे यांच्या तक्रारीवरून धुडगूस घालणाºया कार्यकर्त्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख करीत आहेत.श्रेयावरून घडली घटनासिडको प्रशासनातर्फे वाळूज महानगर परिसरातील जोगेश्वरी घाणेगाव, वाळूज (खुर्द), रामराई आदी ९ गावे सिडकोच्या अधिसूची क्षेत्रातून वगळली आहेत. ही गावे वगळण्यात यावीत, यासाठी कृती समितीतर्फे दीड वर्षापूर्वी सिडकोच्या वाळूज कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. आता ही गावे वगळण्यात आल्यानंतर राजकीय फायदा मिळावा, यासाठी भाजप व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:00 IST