शिवसन्मान जागर परिषद
By Admin | Updated: August 9, 2015 00:26 IST2015-08-08T23:57:06+5:302015-08-09T00:26:14+5:30
जालना : इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

शिवसन्मान जागर परिषद
जालना : इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यांना हा पुरस्कार देण्यात येवू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृति समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून राज्यभर शिवसन्मान जागर परिषद घेण्यात येत आहे. जालन्यात ही परिषद २२ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष कॉ. सांवत म्हणाले की, ब. मो. पुरंदरे हे इतिहासकार नाहीत. त्यांनी राजा शिवछत्रपती या कांदबरीतून मराठा बहुजन स्त्रिांयांची जाणीवपूर्वक बदनामी केली. म्हणून त्यांना हा पुरस्कार शासनाने देवू नये. तो रद्द करावा या मागणीसाठी २२ आॅगस्ट रोजी शिवसन्मान जागर परिषद आयोजित केली आहे. ही परिषद मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह येथे दुपारी २ वाजता होणार आहे. उद्घाटक म्हणून ज्ञानेश महाराव हे राहणार आहे. अध्यक्ष म्हणून आ. जितेंद्र आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, सत्यशोधक अभ्यासिका प्रतिभा परदेशी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. महेबूब सय्यद उपस्थित राहतील.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष संतोष गाजरे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शन तारख, छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोबळे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदाम बनसोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)