रुढी-परंपरेला शिवरायांनी प्रथम विरोध केला
By Admin | Updated: April 18, 2017 23:42 IST2017-04-18T23:40:31+5:302017-04-18T23:42:10+5:30
उमरगा : सैनिकीस्तरावर स्त्रियांचा सन्मान करावयास लावणारा पहिला राजा शिवराय होते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्याम मानव यांनी केले़

रुढी-परंपरेला शिवरायांनी प्रथम विरोध केला
उमरगा : चातुर्वण्य व्यवस्थेतच गुलामगिरीची बीजे रोवली होती़ येथील अस्पृश्य समाजाला त्यांच्या न्याय हक्कापासून दूर ठेवण्याचे काम या व्यवस्थेने केले़ धर्माच्या पगड्यात ठेवण्यासाठी त्यांना अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात गुंतवून ठेवण्यात आले होते़ मात्र, याला सर्वप्रथम विरोध केला तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी़ त्यांनी या सर्व परंपरा झुगारून अठरापगड जातींना एकत्र करून आपले साम्राज्य निर्माण केले. सर्व सामान या तत्वाचा अंमल केला तर सैनिकीस्तरावर स्त्रियांचा सन्मान करावयास लावणारा पहिला राजा शिवराय होते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्याम मानव यांनी केले़
उमरगा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उमरगा येथे सोमवारी आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते़ कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.सदस्य दिग्विजय शिंदे तर किसन कटके, शांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ़ मानव म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील वंचीत घटकातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले़ भारतात दोन तीन हजार वर्षात चातुर्वाण्य व्यवस्था निर्माण केल्याने येथील दिनदुबळे दलित, अधिवासी शोषित बनले़ तर चातुर्वाण्य व्यवस्थेतील सर्वात वरच्या स्तरातील शोषिक झाले़ त्यामुळे युरोपच्या धर्तीवर येथे बंड होऊ शकले नाही़ मात्र, अठराव्या शतकाच्या उत्तराधार्थ व एकोणीसाच्या शतकाच्या सुरुवातीला फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर आदींनी येथील अंधश्रद्धा, रूढी परंपरा यावर प्रहार करून येथील कष्टकरी, वंचीत घटकाला विचार व बंड करण्यास प्रवृत केले़ तसेच समाजाच्या मनातील अंध्दश्रध्दा मुक्त करणे, समानता निर्माण करणे व चातुर्वाण्य व्यवस्था रद्द करण्याचे कार्य शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी केले आहे़ त्त्यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनीही अथक परिश्रम घेत या व्यवस्थेला सर्वप्रथम विरोध केल्याचेही ते म्हणाले़
चमत्कार ही एक फसवेगिरी आहे. या जगात कोणीही चमत्कार करु शकत नाही. महाराष्ट्रात संतासह गाडगेबाबांनी अंधश्रध्देविरूध्द लढाई केली़ वारकरी सांप्रदायाचे यात खूप मोठे योगदान आहे. अंध्दश्रध्दा निर्मुलनासाठी मानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे गरजेचे आहे. गेली ३५ वर्षात हजारो सिध्दपुरुषांना आव्हान देऊन एकाही व्यक्तीने अंध्दश्रध्दा निर्मुलन समितीचे आव्हान स्विकारून चमत्कार घडवू शकले नाहीत. अंध्दश्रध्देविरुध्द कठोर कायदा नसल्याने अनेक भोंदुबाबा यातून सहिसलामत सुटू लागले़ त्यामुळे अंध्दश्रध्दा निर्मुलन कायदयासाठी आंदोलन करुन २०१३ मध्ये तो मंजूर करण्यात आल्याचेही ते म्हणाले़
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी जि. प.सदस्य दिलीप भालेराव, जिप सदस्य दिग्विजय शिंदे, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, माजी नगरसेवक सतीश सुरवसे, जयंती समितीचे अध्यक्ष धीरज बेलम्बकर, दत्तू रोंगे, नागनाथ कांबळे, तानाजी सूर्यवनशी, अभिमन्यू भोसले, जगदीश सुरवसे, मत्सेन्द्र सरपे, सुधीर कांबळे, प्रा.डॉ.एस.टी. गायकवाड, गगन सरपे, महादू गायकवाड आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भालेराव यांनी तर आभार सूर्यकांत वाघमारे यांनी मानले. (वार्ताहर)