शिवनेरी कॉलनीत चिखल अन् संजयनगरात दूषित पाणी

By Admin | Updated: September 13, 2014 00:37 IST2014-09-13T00:37:21+5:302014-09-13T00:37:48+5:30

औरंगाबाद : महानगरपालिकेला कर भरूनही सामान्य नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा देण्याविषयी उदासीन भूमिका असल्याने शिवनेरी कॉलनीत चिखलाची दलदल

Shivneri colony mud and Sanjaynagar contaminated water | शिवनेरी कॉलनीत चिखल अन् संजयनगरात दूषित पाणी

शिवनेरी कॉलनीत चिखल अन् संजयनगरात दूषित पाणी

औरंगाबाद : महानगरपालिकेला कर भरूनही सामान्य नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा देण्याविषयी उदासीन भूमिका असल्याने शिवनेरी कॉलनीत चिखलाची दलदल आणि जिन्सी, संजयनगर बी-२ आणि ए-४ मधील नागरिकांना अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याच्या कटकटी वाढल्या आहेत. अडीच इंची जलवाहिनीतून पाणी मिळावे म्हणून शेकडो मोटारींची ‘झुंज’ संजयनगरात पाहावयास मिळते. जलवाहिनी कोरडीठाक असून, निम्म्याहून अधिक महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सांडपाण्याच्या गटारीची सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला असून, थंडीताप व डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.
वॉर्ड ८४ मधील शिवनेरी कॉलनी खेड्यात की शहरात याचा अंदाजच नागरिकांना येत नाही. कारण पदोपदी दलदल असून, शाळकरी मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या गाड्याही कॉलनीत येऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांना सर्व कामे बाजूला ठेवून ही जबाबदारी पार पाडावी लागते. अनेकदा चिखलात घसरून वृद्ध व मुले पडल्याने जखमी होत आहेत. वीजपुरवठा करणारे जीटीएलचे खांब उपलब्ध नसल्याने लाकडाचा टेकू द्यावा लागत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यात लाकडी टेकू पडल्यास अनर्थ होण्याची भीतीही आहे.

Web Title: Shivneri colony mud and Sanjaynagar contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.