शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पुणे मार्गासाठी एक शिवनेरी बस दाखल

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असलेल्या औरंगाबाद- पुणे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ११ शिवनेरी बस धावत आहेत. यामध्ये आता आणखी एका शिवनेरी बसची भर पडली आहे

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असलेल्या औरंगाबाद- पुणे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ११ शिवनेरी बस धावत आहेत. यामध्ये आता आणखी एका शिवनेरी बसची भर पडली आहे. पुणे- मुंबई मार्गावरील ही शिवनेरी बस आता औरंगाबाद- पुणे मार्गावर धावणार आहे. याशिवाय लवकरच आणखी एक शिवनेरी बस औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल होणार आहे.मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद- पुणे मार्गावर महामंडळाने खाजगी एजन्सीमार्फत शिवनेरी बससेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी पुणे- औरंगाबाद मार्गावर सहा आणि औरंगाबाद- पुणे मार्गावर सहा शिवनेरी बस धावत होत्या. ऐन उन्हाळी हंगामात दोन शिवनेरी बसची मुदत संपल्यामुळे त्या बंद पडल्या. उत्पन्नात भर घालणाऱ्या हंगामात केवळ दहा बसची सेवा सुरू होती. अशातही एक बस अपघातामुळे बंद पडली. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांची संख्या ९ झाली. त्यामुळे दररोज चार ते पाच फेऱ्या रद्द होऊन प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता एक शिवनेरी बस जूनमध्ये औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल झाली. तसेच अपघातग्रस्त शिवनेरीही पूर्ववत सेवेत रुजू झाली. प्रवाशांची सकाळी व सायंकाळी प्रवासाला अधिक पसंती असते. नेमक्या याच वेळी फेऱ्या रद्द होण्याच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी पुणे- मुंबई मार्गावरील शिवनेरी बस औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांनी दिली.