शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा अहमदपुरात जन्मशताब्दी सोहळा

By Admin | Updated: February 25, 2017 00:32 IST2017-02-25T00:30:44+5:302017-02-25T00:32:40+5:30

लातूर : संतश्रेष्ठ सद्गुरु श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे होणार आहे.

Shivalinga Shivchacharya Maharaj's Birthday Celebration in Ahmedpur | शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा अहमदपुरात जन्मशताब्दी सोहळा

शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा अहमदपुरात जन्मशताब्दी सोहळा

लातूर : संतश्रेष्ठ सद्गुरु श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे होणार आहे. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार असून, १ मार्च रोजी होणाऱ्या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खा. राजीव सातव, खा.डॉ. सुनील गायकवाड, खा. भगवंत खुब्बा, खा.बी.बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला विविध मठांचे मठाधीश उपस्थित राहणार आहेत. सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shivalinga Shivchacharya Maharaj's Birthday Celebration in Ahmedpur