वाळूज महानगरात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:55 IST2019-03-23T22:55:00+5:302019-03-23T22:55:13+5:30
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसेनेतर्फे वाळूज महानगर येथे शनिवारी तिथीनुसार उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

वाळूज महानगरात शिवजयंती साजरी
वाळूज महानगर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसेनेतर्फे वाळूज महानगर येथे शनिवारी तिथीनुसार उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
बजाजनगर येथील लोकमान्य चौकात तालुका प्रमुख बप्पा दळवी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे प६जन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपतालुका प्रमुख सचिन गरड, कृष्णा राठोड, पं.स. सदस्य राजेश साळे, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत साळे, सुनिल काळे, कैलास चव्हाण, सागर शिंदे, पोपट हांडे, भानुदास राठोड, पितांबर शिंदे, अमोल पोटे, दिलेश लोंढे, अशोक वाहुळ आदींची उपस्थिती होती. सिडको वाळूज महानगर १ येथे तीसगावचे उपसरपंच विष्णू जाधव यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पूष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गणेश कोल्हे, राकेश सक्सेना, यशवंत चौधरी, राम यादव, देविदास चव्हाण, लक्ष्मण मंडकर, सत्यनारायण गग्गड, अरुण बुचाले, अशोक दुबिले, अर्जुन राठोड आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. परिसरातील रांजणगाव, जोगेश्वरी, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, वाळूज आदी भागात शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.