शिवस्मारक सुशोभीकरणाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:53 IST2019-01-28T21:52:05+5:302019-01-28T21:53:02+5:30
वाळूज ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवस्मारक सुशोभीकरणाचे भूमिपूजन
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामनिधीतून ३ लाखांचा निधी खर्च करून या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, सोमवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
येथील झेंडा मैदान परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी गावातील नागरिक व शिवप्रेमींनी केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवस्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ग्रामनिधीतून ३ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. सोमवारी (दि.२८) सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सरपंच पपीन माने यांच्या हस्ते करण्यात आले.