शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 15:57 IST

शहरात उद्यापासून चार दिवसांच्या 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन

औरंगाबाद: १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात चार दिवशीय 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आज शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही यावेळी शिवसेना आमदारांनी स्पष्ट केले. मात्र, क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी होणार याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पालकमंत्री सुभाष देसाई अनावरणाची तारीख जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा क्रांतीचौक येथे स्थापित झाला असून शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी शहरात 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नितीन घोगरे काका यांनी सांगितले आहे. या उत्सवात शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना कायम तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्याच्या आग्रही मताची  राहिली आहे. यामुळे शहरात तारखेनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे आयोजन केल्याने शिवसेनेने तिथीचा आग्रह बाजूला ठेवला का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

१५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवजागरशिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सुरुवात होणार आहे. १५ ते १७ फेब्रुवारी रोजी शहरातून तब्बल ३६  शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाल यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील ,त्याचप्रमाणे महिला  आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ४ वाजाता शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहेत. तर या दरम्यान, रोज सायंकाळी ४ वाजात महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

असे असतील कार्यक्रम१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी सादर करणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे.  तसेच दि.१८ तारखेला सकाळी १० वाजता मानवंदना व रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत १००० तरुण तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे. या उत्सवात शिवप्रेमींनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा  संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, समन्वयक कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivjayantiशिवजयंतीAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज