शिवसेनेची नांदेडात रॅली
By Admin | Updated: August 23, 2014 00:48 IST2014-08-23T00:09:04+5:302014-08-23T00:48:02+5:30
नांदेड : माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांचे शुक्रवारी सकाळी रेल्वेने नांदेडात आगमन झाले़ यावेळी रेल्वेस्टेशन ते चिखलीकर यांचे निवासस्थान अशी रॅली काढली़

शिवसेनेची नांदेडात रॅली
नांदेड : राष्ट्रवादीला राम राम ठोकून दोन दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांचे शुक्रवारी सकाळी रेल्वेने नांदेडात आगमन झाले़ यावेळी रेल्वेस्टेशन ते चिखलीकर यांचे निवासस्थान अशी रॅली काढली़
लोहा-कंधार मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे लक्षात येताच माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन दिवसापूर्वी सेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला़ त्यांच्यासोबत जि़प़सदस्य, आजी-माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आदी डझनभर कार्यकर्त्यांनीही सेनेत प्रवेश घेतला़