शिवसेना करणार भाजपाची कोंडी
By Admin | Updated: December 13, 2014 00:29 IST2014-12-13T00:18:30+5:302014-12-13T00:29:09+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद शिवसेना-भाजपा युतीचा ‘संसार’ मुंबईत गुण्यागोविंदाने सुरू असला तरी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकांवरून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

शिवसेना करणार भाजपाची कोंडी
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
शिवसेना-भाजपा युतीचा ‘संसार’ मुंबईत गुण्यागोविंदाने सुरू असला तरी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकांवरून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. कालपर्यंत सेनेत असलेले नगरसेवक आज भाजपामय झाले. अशा नगरसेवकांचे वार्ड भाजपाला न सोडण्याची तयारी सेनेने सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासाठी ‘मुंबई’ अनुकूल असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही नेत्यांना, कार्यकर्त्यांना युती अजिबात नको आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये माजी आ. किशनचंद तनवाणी यांच्यासह काही नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. हे नगरसेवक परत निवडून येणार नाहीत, या दृष्टीने सेनेने व्यूहरचना सुरू केली आहे. कालपर्यंत सेनेकडे असलेले वार्ड युतीमध्ये भाजपाकडे कसे ओढून आणता येतील, या बाबत भाजपाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.