शिवसेनेकडून ४० हजार गरजूंना धान्य व किराणा कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST2021-04-30T04:04:12+5:302021-04-30T04:04:12+5:30
शिवसैनिकांच्या माध्यमातून गावातील गरजूंना घरपोच ही मदत देण्यात येणार असल्याने मदत कार्य सुरू असताना कोणीही गर्दी करू नये ...

शिवसेनेकडून ४० हजार गरजूंना धान्य व किराणा कीट
शिवसैनिकांच्या माध्यमातून गावातील गरजूंना घरपोच ही मदत देण्यात येणार असल्याने मदत कार्य सुरू असताना कोणीही गर्दी करू नये असे आवाहन समीर यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात सिल्लोड शहरात जवळपास १० हजार गरजूंना घरपोच जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्यात गुरुवारी ग्रामीण भागातील ४० हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तू व किराणा किट वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटात हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब कुटुंबाला आधार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदार संघात ही मदत पोहोचविण्यासाठी किमान एक आठवडा लागणार आहे.
फोटो कॅप्शन : गोरगरीब व गरजू लोकांना देण्यासाठी तयार करण्यात आलेले धान्य व किराणा किट दिसत आहे.
280421\img-20210428-wa0269_1.jpg
गोरगरीब व गरजू लोकांना देण्यासाठी तैयार करण्यात आलेल्या धान्य व किराणा किट दिसत आहे.