शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:46 IST

''हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात''

औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते तथा नागरिकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला जिल्ह्यातील पाच आमदारांचे बळ मिळाले आहे. या सर्व प्रकारावर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी धारदार टीका केली आहे. जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांना सर्व मिळाले तरी त्यांनी बंड केले. येथे कोणाला हिंदुत्व, राजकीय नितीमत्तेशी काही देणघेण नाही जे पैसे देतील तिकडे हे आमदार जातात, अशी टीका एका वृत वाहिनीशी बोलताना खा. जलील यांनी केली. 

राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपाने जोरदार टक्कर देत धूळ चारली आहे. या दोन धक्क्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार सोबत घेत बंड केल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे यांच्या बंडात मराठवाड्यातील तब्बल ८ आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे यांच्या गोटात गेले आहेत. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांसह प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, रमेश बोरणारे या आमदारांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कट्टर शिवसैनिकांनी पक्षात बंडखोरी केल्याने या मागचे राजकारण काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाना साधला आहे. आमदारकी, मंत्रीपद दिले तरी हे बंडखोरी करतात. हिंदुत्व, नितीमत्ता याच्याशी त्यांना काही देणेघेण नाही. हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात अशी, जहरी टीका खा. जलील यांनी केली आहे. तसेच हा पैशांचा खेळ कसा होतो, हे मी आकडेवारीनुसार दाखवून देईल असा दावाही खा. जलील यांनी यावेळी केला. 

सेना आमदार राज्याबाहेर गेले कसे बळजबरीनं आमदारांना घेऊन गेले असं होऊ शकत नाही. इतके सगळे आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातला गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही. सर्व आमदारांना पोलीस संरक्षण आहे. नियमाप्रमाणे जिल्हा सोडताना पोलिसांना कार्यालयात कळवावं लागतं. ४० आमदार गुजरात गेले थैलीत घेऊन गेले का? असा टोला खा. जलील यांनी लगावला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ