शिवसेना नेत्यांनी घेतला आरोग्य केंद्रांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:51+5:302021-05-07T04:05:51+5:30
खुलताबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत. नागरिकांची काळजी घेण्यासह त्यांना या ...

शिवसेना नेत्यांनी घेतला आरोग्य केंद्रांचा आढावा
खुलताबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत. नागरिकांची काळजी घेण्यासह त्यांना या संक्रमणातून मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन देत सर्वशक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
तालुक्यातील गदाणा, बाजार सावंगी, वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खैरे यांनी गुरूवारी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष जगताप यांनी रूग्णालयातील अडीअडचणी व सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. खुलताबाद कोविड सेंटरला खैरे यांनी भेट दिली, यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी कोविड सेंटरमध्ये बाधित रूग्ण व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, नायब तहसीलदार सतीश देशमुख, उदय मानवतकर, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, कोविड सेंटरचे केअरटेकर शहजाद बेग, विधानसभा संघटक गणेश अधाने, किशोर कुकलारे, विष्णू फुलारे, आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : खुलताबाद ग्रामीण रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरची पाहणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.