शिवसेनेत नाराजी उफाळली; चुंगडेंचा राजीनामा

By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:16:22+5:302015-04-17T00:43:35+5:30

बीड: निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक म्हणून ख्याती असलेले उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यावर घणाघाती आरोप करीत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

Shiv Sena dissatisfied; Chungdanna resigns | शिवसेनेत नाराजी उफाळली; चुंगडेंचा राजीनामा

शिवसेनेत नाराजी उफाळली; चुंगडेंचा राजीनामा


बीड: निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक म्हणून ख्याती असलेले उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यावर घणाघाती आरोप करीत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. दरम्यान, चुंगडे यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश करीत राजकीय दिशा स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीवेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी सेना सोडली होती. आता चुंगडे यांनी राजीनामा दिला आहे.
शहरातील एका मंगल कार्यालयात प्रवेश समारंभ व पत्रकार परिषद गुरुवारी पार पडली. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवाजी जाधव, सुहास पाटील, गणेश वरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना चुंगडे म्हणाले की, जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेना विेरोधकांच्या दावणीला बांधली आहे. जगताप यांचा संपुर्ण ‘मॅनेजींग’ कार्यक्रम होता. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जगताप यांनी विरोधकांच्या हस्तकामार्फत शासकीय विश्राम गृहावर पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोपही चुंगडे यांनी केला. याबाबत आपण संपर्क प्रमुख मोरे व प्रभु यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही. केवळ जिल्हाप्रमुखांच्या कार्यप्रणाली व तडजोडीच्या राजकारणास कंटाळून राजीनामा देऊन शिवसंग्राम मध्ये प्रवेश करत असल्याचे चुंगडे यांनी जाहीर केली. मस्के यांनी त्यांचे स्वागत करीत मनोगत व्यक्त केले.
पक्षप्रमुख ठाकरे यांना
दिलेल्या पत्रात गंभीर आरोप
जयसींग चुंगडे यांनी राजीनामा देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. शिवसेना पक्ष बीड जिल्ह्यात मोडकळीस येण्याचे कारण केवळ जिल्हा प्रमुख अनिल जगताप आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये धडाडीने कधीच निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरुन कार्य केले नाही. जगताप यांचे इतर पक्षाशी तडजोडीचे राजकारण आहे. त्यामुळे शिवसेनेची हाणी झाली आहे. परिणामी शिवसैनीक पक्षापासून दुरावलेले आहेत. न.प. निवडणुकीला माजी पालकमंत्री क्षीरसागर यांची भाऊजयी आमच्याच विभागातून उभ्या होत्या. माझ्या पत्नीस या विभागातून उभे केले जाईल असे आश्वासन जिल्हा प्रमुखांनी दिले होते. मात्र ऐनवेळी जिल्हा प्रमुखांनी पक्षाचा बी फॉर्म मला देण्यास नकार दिला. त्यामुळ माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. आर्थीक तडजोडीच्या कारणामुळे एकही शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला नाही. याची माहीत पक्षप्रमुखांना देण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता माझा संपर्क होऊ दिला नसल्याचे चुंगडे यांनी पत्रात म्हटले आहे. मी एक सच्चा शिवसैनिक असून ज्या-ज्या वेळी मी पक्षाच्यावतीने आंदोलने, मोर्चे, धरणे केली त्या-त्या वेळी जिल्हाप्रमुखांनी सोबत राहण्याऐवजी दाबण्याचा प्रयत्न केला. माझी नाराजी पक्षाबद्दल नसून केवळ जिल्हाप्रमुख जगताप यांच्यावर असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena dissatisfied; Chungdanna resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.