शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

'संभाजी महाराज विमानतळ'साठी शिवसेना-भाजप सोबत; देसाई-कराड भेटले केंद्रीय मंत्री शिंदेंना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 15:57 IST

शहर नामांतर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना विमानतळाच्या नामांतरावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे. 

औरंगाबाद: शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून शिवसेनाविरुद्ध भाजप, मनसे असा वाद पुन्हा पेटला आहे. या विषयावरून विरोधकांनी वेळोवेळी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र,  औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीमहाराज करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे चित्र आज दिसले. शिवसेना नेते , उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावर आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा सोबत होते. 

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने शिवसेनेला कोंडीत करण्याची एकही संधी सोडली नाही. मागील काही दिवसांपासून यात मनसेने सुद्धा उडी घेतली आहे. यातच औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर जोरदार टीका सुरु केल्याने शिवसेना काहीशी मागे गेल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आम्ही सुरुवातीपासून संभाजीनगरचा म्हणतो, नामकरण करण्याची गरज नाही अशी भूमिका स्पष्ट केली. यानंतर भाजप आणि मनसे यांनी शिवसनेवर हल्ला सुरु केला आहे. मात्र, शहरासोबत विमानतळाचे नामकरण हा मुद्दा ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र शासनाच्या अधिकारात येणारा हा मुद्दा आता शिवसेनेने हाती घेतला असून उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. देसाई यांनी मंत्री सिंधिया यांना एक निवेदन देत विमानतळ नामकरण, धावपट्टी विस्तार आदी विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची देखील उपस्थिती होती. शहराच्या नामांतरावरून विरोधात असणारे विमानतळाच्या नामांतरावर मात्र सोबत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काय केली मागणीउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलेल्या निवेदनात औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीमहाराज विमानतळ करणे, येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे अशा मागण्या आहेत. यासोबतच विमानतळाची धावपट्टी विस्तारावर देखील या भेटीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. शहर नामांतर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना विमानतळाच्या नामांतरावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईBhagwat Karadडॉ. भागवतAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ