शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुंबईत परणाऱ्या बंडखोरांचे शिवसेना स्टाईलं 'स्वागत' करण्यास तयार; चंद्रकांत खैरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 19:06 IST

इकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे बंडखोर मजा करत आहेत

औरंगाबाद: राज्यात पाऊस लांबल्याने  नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीत बंडखोर आमदार मजा करत आहेत. काय डोंगर, काय हॉटेल म्हणणारे बंडखोर पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. त्या गद्दारांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. आज सकाळी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने शहरातून बाईक रॅली काढली यावेळी ते बोलत होते. 

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील पाच शिवसेना आमदारांचा समावेश आहे. यात एक कॅबिनेट , तर एक राज्यमंत्री आहे. सामान्य शिवसैनिक असलेल्या बंडखोरांना पक्षाने आमदारकीसह अनेक पदे दिली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून आमदारांनी शिंदेयांच्या नेतृत्वात बंड केले. याबाबत शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवसेनेन लागलीच बंडखोरांच्या मतदारसंघात निषेध मेळावे घेणे सुरु केले आहे. आज बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर मुंबईत परत येताच त्यांचे 'स्वागत' करण्यास शिवसैनिक तयार आहेत,असा इशारा दिला. 

राज्यात पाऊस लांबला तिकडे बंडखोर हॉटेलातइकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे गुवाहाटीत बंडखोर मजा करत आहेत. काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, असे म्हणत बंडखोर तिकडे बसले आहेत. त्यांना नागरिकांची चिंता नाही. शहरातील बंडखोर आमदार तर कधीच सामान्य जनतेत गेले नाहीत. त्या गद्दारांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असेही खैरे यावेळी म्हणाले.    मतदारांना विश्वास, चुकीचे काम करणार नाही : संजय शिरसाट दरम्यान, आज बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आ. संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. आम्ही गुवाहाटी येथे स्वखुशीने असून, आम्हाला कोणीही संपर्क केलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदारांना विश्वास आहे की, आम्ही चुकीचे काम करणार नाहीत, असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला. तसेच आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेतच राहू असेही आ. शिरसाट म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ