शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकाने लिहिले थेट 'रक्तपत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 17:42 IST

पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. 

औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसैनिक अस्वथ आहे. बंडखोरांचे समर्थक आणि ठाकरे समर्थक अशी विभागणी शिवसैनिकांत झाली आहे. बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिल्याची भावना   सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहे. ठाकरे घराण्याशी निष्ठा दाखवत एका शिवसैनिकांने तर 'रक्तपत्र' लिहून उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे घराणे आणि शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, असा ठाम निर्धार कांबळे यांनी व्यक्त केला. 

मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्यानंतर शिवसेनेत बंडखोरी करत पक्षात उभी फुट पाडली आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असून ही संख्या ५० जवळ जाईल असा दावा केला आहे. तसेच शिंदे यांनी माजी आमदार-खासदार, जुने शिवसैनिक यांना संपर्क करणे सुरु केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच पाईक असून खरे शिवसैनिक आम्हीच आहोत, असे म्हणत शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोरांनी पक्षातच वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, शिंदे सर्व बंडखोरांसह आसाममध्ये आहेत. तर दुसरीकडे राज्यात त्यांचे समर्थक विरुद्ध ठाकरे यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. 

पक्षातील भूकंपानंतर ठाकरे यांच्या आदेशाने यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेचे निषेध मेळावे सुरु केले आहेत. अस्वस्थ शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. शहरात तर चेतन कांबळे या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रक्तपत्र लिहिले आहे. पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आज फक्त रक्ताने पत्र लिहिले आहे उद्या गरज पडली तर रस्त्यावर उतरून बंडखोरांना धडा शिकवू, असा इशारा चेतन कांबळे या शिवसैनिकाने दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ