शहीद भगतसिंह किलबील शाळेत शिवचरित्र पारायण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:07 IST2019-02-16T21:07:20+5:302019-02-16T21:07:36+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंह किलबील शाळेत शनिवारी शिवचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते.

शहीद भगतसिंह किलबील शाळेत शिवचरित्र पारायण सोहळा
वाळूज महानगर: रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंह किलबील शाळेत शनिवारी शिवचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन देशमुख, माजी सैनिक नानासाहेब हरकल, शंतनू लाड, इस्माईल शेख, वाहेद पठाण, दिपाली देवकते, वर्षा देवताळकर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या एक हजार विद्यार्थी व ५० शिक्षकांनी शिवचरित्राचे वाचन केले.
कार्यक्रमास किरण निकम, सागर लाड, आत्माराम देवरे, उत्कर्ष आहेर, विनय लोकरे, जगदीश दिघे, अण्णासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते.