‘मालमत्तानोंदणी’त शिरूर अनंतपाळ तालुका अव्वल
By Admin | Updated: October 22, 2014 01:18 IST2014-10-22T01:00:10+5:302014-10-22T01:18:34+5:30
एस़आऱमुळे ,शिरूर अनंतपाळ संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र कक्ष अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने इलेव्हन कोर अज्ञावलीत सर्व प्रकारच्या मालमत्ता नोंदणीसाठी मालमत्तानोंदणी

‘मालमत्तानोंदणी’त शिरूर अनंतपाळ तालुका अव्वल
एस़आऱमुळे ,शिरूर अनंतपाळ
संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र कक्ष अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने इलेव्हन कोर अज्ञावलीत सर्व प्रकारच्या मालमत्ता नोंदणीसाठी मालमत्तानोंदणी अभियान राबविण्यात येत असून, एकंदर सत्तावीस नमुन्यातील माहिती जिल्ह्यात सर्वप्रथम आॅनलाईन करण्यात पंचायत समितीने बाजी मारली आहे़ परिणामी शिरूर अनंतपाळ तालुका मालमत्ता नोंद अभियानात अव्वल आला आहे़
संग्राम कक्ष अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत आणि सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामपंचायतमार्फत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिरूर अनंपताळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन अभंगे, सभापती मीरा कांबळे, उपसभापती संगीता जाधव यांनी विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांच्या नेतृत्वात संग्राम टीम तयार केली असून, समन्वयक विनोद महार्नवर, बालाजी गव्हाणे यांच्या पुढाकाराने सर्व संग्राम कक्ष अद्यावत सुरु करून इलेव्हन कोर या संगणक अज्ञावलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेसंबंधी एकंदर २७ नमुन्यांत माहिती परिपूर्ण भरण्यात आली असून, नमुनानंबर आठ शंभर टक्के आॅनलाईन करण्यात आला आहे़
त्यामुळे मालमत्तानोंद अभियानात पंचायत समितीने बाजी मारली असून, जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे़ त्याचबरोबर संग्राम कक्षांतर्गत असलेल्या एसी या प्रोफाईलवर या अज्ञावलीत ३३ हजार कुटुंब व कुटुंबातील व्यक्तीच्या नोंदी आॅनलाईन करण्यात आल्या आहेत़
शिवाय, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खाते उघडणे आदी सुविधासुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत़ यात येरोळ ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे़ त्यामुळे ग्रामसेवक नागनाथ राऊत, सरपंच मंगेश पाटील, संगणक परिचर विनोद लोंढे यांचा शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्कावार यांनी नुकताच सत्कारही केला आहे़