मालवाहतूक जीपची दुचाकीला धडक
By Admin | Updated: July 11, 2016 00:22 IST2016-07-11T00:09:56+5:302016-07-11T00:22:33+5:30
उस्मानाबाद : भरधाव वेगातील मालवाहतूक जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक दाम्पत्य जखमी झाले़ जखमीतील इसमाच्या डोक्याला

मालवाहतूक जीपची दुचाकीला धडक
उस्मानाबाद : भरधाव वेगातील मालवाहतूक जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक दाम्पत्य जखमी झाले़ जखमीतील इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे ‘रेफर’ करण्यात आले आहे़ हा अपघात रविवारी दुपारी तालुक्यातील किणी गावाजवळ घडला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील सुधाकर ज्योतीराम हिंगे हे रविवारी दुपारी त्यांच्या पत्नी दिपाली हिंगे यांना दुचाकीवर घेवून शिंगोली येथून गावाकडे जात होते़ त्यांची दुचाकी किणी शिवारात गेली असता पाठीमागून आलेल्या मालवाहतूक जीपने जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील सुधाकर हिंगे व त्यांच्या पत्नी दिपाली हिंगे हे दोघे जखमी झाले़
अपघातानंतर जीपचालकाने घटनास्थळावरून पळ काढला़ जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यातील सुधाकर हिंगे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर रेफर करण्यात आले आहे़ तर दिपाली हिंगे यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रात्री रुग्णालयात जखमींचा जबाब नोंदविला असून, उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
किणी शिवारात अपघात घडल्यानंतर जखमींना मदतीसाठी कोणीच पुढे आले नव्हते़ या मार्गावरून जाणाऱ्या माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना रस्त्यावरील अपघातातील जखमी दिसले़ ओमराजे यांनी तत्काळ दोन्ही जखमींना स्वत:च्या वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ त्यामुळे जखमींवर वेळेत उपचार करण्यास मदत झाली़